नोटिसांच्याबाबतीत गैरसमजांना सभासदांनी बळी पडू नये – प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नोटिसांच्याबाबतीत गैरसमजांना सभासदांनी बळी पडू नये – प्रा.संग्राम चव्हाण

 

सोलापूर // प्रतिनिधी

भीमा सहकारी साखर कारखान्याने आपल्या सर्व नव्या-जुन्या फाउंडर सभासदांना आपल्याच कारखान्याला ऊस गाळपाला पाठवण्या संदर्भात आवाहन नोटिसा पाठवल्या आहेत.परंतु विरोधक नेहमीप्रमाणे वस्तुस्थितीचा विपर्यास करून भीमा प्रशासनाच्या कामकाजात आडकाठी आणत असून सभासदांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. त्यांनी लगेच सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची भाषा करून सभासदांची दिशाभूल सुरू केली आहे. विरोधकांना सध्या जळी स्थळी काष्टी फक्त राजकारणच दिसत असून हे चुकीचे आहे.भीमा कारखान्याने गाळप क्षमतेचा नवीन कारखाना उभा करू विस्तार केला आहे. आगामी हंगामा- साठी कारखान्याला 8 ते 10 लाख टन उसाची आवश्यकता आहे. भिमाच्या आजूबाजूला शेजारी अनेक खाजगी कारखाने असून हे खाजगी कारखाने स्पर्धा करून भिमाच्या कार्यक्षेत्रातील शेलका ऊस हंगामाच्या सुरुवातीलाच तोडून नेतात. मात्र सहकारी कारखान्यांना नोंदीच्या क्रमानेच ऊसतोड प्रोग्रॅम राबवावा लागतो. ऊस तोड लवकर मिळते म्हणून बरेच सभासद इतर कारखान्याला ऊस घालण्याची गडबड करतात व परिणामी भीमा कारखान्याला हंगामात गाळपासाठी ऊस कमी पडतो.सभासद हा कारखान्याचा मालक असतो आणि त्याने आपल्याच कारखान्याला ऊस देणे हे त्याचे आद्य कर्तव्य असून या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी आपल्या सभासदांना संस्थेने पत्र सुद्धा द्यायचे की नाही? हा संस्थेचा दैनंदिन कारभाराचा भाग असून सभासदत्व रद्द करण्याचा कोणताही हेतू नसून विरोधकांनी अफवांचे पिक जोरात आणले असून असल्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये. भिमाच्या वजन काट्या प्रमाणेच खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भिमाच्या सभासदांनी यंदाच्या हंगामात आपला ऊस भीमाला घालून आपल्या संस्थेची भरभराट करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्रामदादा चव्हाण यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना केले. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सूर्यकांत शिंदे साहेब श्री बाबासाहेब जाधव श्री राजेंद्र बाबर श्री भारत पाटील श्री माणिक बाबर, श्री बापूसो चव्हाण, श्री धनंजय बाबासाहेब देशमुख श्री किसन जाधव श्री तुषार दादा चव्हाण श्री गणेश चव्हाण श्री सिद्धेश्वर अनुसे, अनिल गवळी,पोपटराव वसेकर श्री भीमा वसेकर श्री पोपटराव सोनटक्के,आदी सर्व जण उपस्थित होत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here