मोहोळ तालुक्यात लपवून ठेवलेली 21 लाखाची अवैद्य दारू जप्त , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यात लपवून ठेवलेली 21 लाखाची अवैद्य दारू जप्त , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई

सोलापूर – गोवा राज्य निर्मित मोठ्या लपवून ठेवलेल्या दारूच्या साठ्यावर कारवाई करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला यश आले आहे.मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील बाबर वस्ती येथून 301 दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क राज्य भरारी पथकाला गोवा राज्य निर्मिती अवैद्य मद्याचा साठा लपवून ठेवल्याची गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली होती.त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रवीण निकाळजे आणि पथकाने मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील बाबर वस्ती येथील गट नंबर 335 येथे छापा टाकला असता गोवा राज्य निर्मिती 21 लाख 69 हजार रुपयांचे 301 अवैध दारूचे बॉक्स मिळून आले.जागेच्या गट नंबर वरून फरार आरोपीचा शोध घेत येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाचे अधीक्षक यांनी दिली आहे.

नितीन धार्मिक , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here