‘खेळात घ्या नाहीतर गल मातीनं बुजवितो’ भीमा बचावचा रडीचा डाव! सभासदांचे नुकसान:प्रा.संग्राम चव्हाण सर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

‘खेळात घ्या नाहीतर गल मातीनं बुजवितो’ भीमा बचावचा रडीचा डाव! सभासदांचे नुकसान:प्रा.संग्राम चव्हाण सर

 

संख्येने इन-मीन -साडेतीन असलेल्या व कोथाळे-टाकळी-सुस्ते एवढीच त्रिज्या असलेल्या भीमा बचाव समितीने भीमाचे सभासद-कामगार चातक पक्षाप्रमाणे राज्याच्या 35 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची वाट पाहत असताना परिस्थितीचे गांभीर्य मुद्दामहून विसरून केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी कोल्हापूरच्या आठवडा वार्या करून दिग्गज नामदार नेत्यांच्या पायर्या गुळगुळीत करुन मुन्नासाहेब व बंटिसाहेब या दिग्गज नेत्यांमधील राज्यभर प्रसिद्ध असलेल्या राजकिय वैराचा गैरफायदा घेत ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ‘ या स्वस्त कुटनितीच्या न्यायाने भीमावरच कारवाई करण्याचे व सरकारची आर्थिक मदत भीमा कारखान्याला मिळु नये म्हणून साकडे घालून दोन्ही नामदारांची दिशाभूल करून ज्या रोगट,स्वार्थी व नकारात्मक मानसिकतेचे जे घाणेरडे प्रदर्शन केले ते कुठल्याही जबाबदार लोकप्रतिनिधीला न शोभणारे असून ” मला खेळात घ्या नाहीतर मी गल मातीनं बुजवितो ” अशा प्रकारची विकृत मानसिकता ठेवून बचाव समिती काम करत असल्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड असंतोष व दुःख पसरलं असून असली विकृत मानसिकता काय कामाची?अशी सर्व सभासदांमधे प्रतिक्रिया ऊमटली असून भीमाची निवडणूक ही एक 22 हजार संसारांशी निगडीत सार्वजनिक प्रक्रिया असून ञइथं व्यक्तिकेंद्रित मतांना, कृत्यांना,भावनांना किंमत नसते. नेतृत्वा जवळ कायम इच्छुक कार्यकर्त्यांची गर्दी असते. इतर सक्षम मंडळींना संधी देण्यासाठी जर नेतृत्वाने संचालक मंडळातून खांदेपालट म्हणून ‘डच्चु’ दिला तर समजून घेणे गरजेचे असते. विद्यमान संचालक मंडळाचा कारभार चुकीचा वाटत होता तर मग त्याचवेळी तडकाफडकी राजीनामा का दिला नाही? दुसऱ्या पंचवार्षिक ला पुन्हा एकदा भीमा परिवाराकडून शेवटच्याक्षणापर्यंत उमेदवारीसाठी वाट का पाहिली? तुमच्याच कारकीर्दीमध्ये तुम्हीच वाढविलेले सभासद तुम्हीच हरकत घेऊन आत्ता काढून टाकण्याची मागणी करत आहात व त्या अर्जावर आपण सभासदांचा ठपका येईल व कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून सही करणे टाळून पडद्यामागून सूत्रे हालवत आहात ही साधी गोष्ट भीमाच्या सभासदांच्या लक्षात येणार नाही काय? या सभासदांच्या सर्व प्रश्‍नांना प्रथम उत्तर द्या.मग भीमा बचाव स्थापन करा.भीमा चे सभासद दुधखुळे नसून ते सुज्ञ आहेत.असली नकारात्मक मानसिकता घेऊन सभासदांचे नुकसान करणाऱ्या या
‘टुकार टोळीला’ भीमाचे सभासद माफ करणार नाहित व अशा मंडळींना तांदळातील खड्या प्रमाणे बाजूला काढतील.’भीमा बचाव’ हे पवित्र नाव देऊन भीमा या समासदांच्या मंदिरालाच मातीत गाडायला निघालेल्या ह्या उताविळ पोरकट,बेदरकार,
बेजबाबदार मंडळींना सभासद व कामगारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेऊन त्यांचा सपशेल बळी देताना जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटायला हवी होती! सरकारच्या भरीव मदतीशिवाय थकित देयकांच्या प्रश्न सुटणार नाही हे चांगले माहित असताना सुद्धा कामगारांची दिशाभूल करत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हतबल,गरीब कामगारांना वारंवार आमरण उपोषणाला प्रेरित करून त्यांच्या जिविताशी खेळताना ईन- मिन-साडे तीन लोकांच्या बचाव समितीने आपले सहकारातले प्रगाढ ज्ञान घरच्या खुंटिला टांगून ठेवले होते काय? हे एक भ्याड व राजकारणातल्या मर्दुमकिला न शोभणारे कृत्य असून भीमा कारखाना कुठेही बुडायला लागलेला नसून असल्या कुठल्या “बचाव” समितीची कारखान्याला गरज नसून इन-मिन-साडेतीन लोकांच्या बचाव समितीने आपली “बचाव-बचाव”ही मिडियावर बाष्कळ टिवटिव त्वरित बंद करावी व सभासदांनी ज्यांच्या हातात भीमा चा कारभार सोपविला आहेत त्यांना त्यांचं मार्ग काढण्याचे काम विना अडथळा करू द्यावे. कामगारांविषयी खोटा कळवळा-पुळका दाखविणं थांबवावं, ‘मुह में राम बगल मे छुरा’हि भूमिका सोडावी व आडवा पाय न मारता संस्था-सभासद व कामगारांचे हित व पुढिल प्रगती साधु द्यावी. कारखान्याची घोडदौड सुरूच आहे. विद्यमान संचालक मंडळ व चेअरमन साहेब यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सभासदांच्या मागणीनुसार व काळाच्या गरजेनुसार विस्तारीकरण व सह-विद्युत निर्मिती प्रकल्प हे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले असून लवकरच इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प उभा करण्याचा मानस आहे.मात्र इन-मीन-साडे तीन लोकांची भीमा बचाव समितीची हि तीन पायांची माशी कारखान्याच्या ‘भंगाराच्या शेंबडातून’
बाहेर यायला तयार नाही. भंगार हे भंगार असते ती एक अडगळ असते त्याला कवटाळून किती दिवस बसायचं असतं! मोठा विचार महत्त्वाचा असतो! असल्या ‘भंगार विचारसरणी’च्या सुमार क्षमतेच्या व कमी पोहोच असलेल्या भीमा बचावच्या हातात भिमाचे भवितव्य सुज्ञ सभासद सोपवतील का हो?त्यांना ते पेलवणार आहे का हो? अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत खडा सवाल भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here