DVP मल्टिस्टेट पारदर्शक कारभारामुळे जनमानसात विश्वास निर्माण करेल:अभिजीत पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(तुळजापूर येथे DVP पिपल्स मल्टिस्टेट शाखेचा उदघाटन संपन्न)

DVPदि पिपल्स मल्टीस्टेट तुळजापूर या नवीन शाखेचा आज उदघाटन सोहळा तुळजापूर देवस्थानचे महंत तुकोजी बुवा, महंत माऊजीनाथ बुवा, उस्मानाबाद लोकसभा खासदार श्री.ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद  कळंबचे आमदार श्री.कैलास  पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यासह अनेक मान्यवरांसह पार पडला.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, डिव्हिपी उद्योगाचे वटवृक्ष मोठं व्हावे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीच्या जोरावर सर्वसाधारण माणूस यशोशिखरावर विराजमान होऊ शकतो याची प्रचिती आणि आपल्या चांगल्या कर्तत्वाने पूर्वाश्रमीच्या पुण्याने माणूस सर्वसामान्यांच्या हिताचे आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करू शकतो ह्याची प्रेरणा डीव्हीपी समूह व अभिजीत पाटील यांच्यकडून आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्याचबरोबर डीव्हीपी ग्रुपच्या मोठा वटवृक्ष होण्यासाठी मी आणि आमचे सर्व सहकारी सातत्याने आपल्या सोबत असल्याचे ग्वाही दिली. कोरोनाच्या काळात अविरत कार्य अभिजीत पाटील यांच्या हातून घडले आहे. देशात साखर कारखानदारीत पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा ऑक्सिजन पुरवठा करून लाखोंना जीवदान देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या नगरीत अल्पावधीत काळात नागरिकांचे हित जोपासत DVP दि पिपल्स मल्टीस्टेटचा शुभारंभ करण्यात आला. फिरते ATM, NEFT, RTGS, IMPS, QR कोड, मोबाईल  बॅकींग, लाॅकर सुविधा अशा विविध सुविधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. “आम्ही जपतो सर्वकाही” हे आपले ब्रीदवाक्य ही संस्था सार्थ ठरवते आहे याचा मनस्वी आनंद वाटतो. उत्कृष्ट व पारदर्शक कारभारामुळे जनमानसात आपल्या मल्टीस्टेटने एक अतूट विश्वास निर्माण करेल असा विश्वास युवा नेतृत्व अभिजीत आबा  पाटील यांनी व्यक्त  केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष श्री.सचिन रोजकरी, जि.प.अध्यक्ष ॲड. श्री.धीरज पाटील, मा.नगराध्यक्ष श्री.विनोद खपले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री.गोकुळ शिंदे, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष श्री.अमर मगर मा.नगराध्यक्ष श्री.विनोद गंगणे,  मा. नगरसेवक श्री.राजामामा भोसले, पुजारी मंडळ अध्यक्ष श्री. सज्जनराव सोळुंके,मा.नगरसेवक श्री.विशाल रोचकरी, श्री.सुरेश पाटील, श्री.संतोष कदम, श्री.नारायण नवरे , डाॅ.श्री.दिग्विजय कुतवळ, श्री.सुनील रोचकरी, डाॅ श्री. मकरंद बाराते, शेतकरी संघटनेचे नेते श्री.दिपक भोसले तसेच मल्टीस्टेटचे चेअरमन श्री. संदेश दोशी, श्री. सुरज पाटील, धाराशिव  साखर  कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.अमर  पाटील, संचालक  श्री.संतोष  कांबळे, श्री.रणजित  भोसले, श्री.दिपक आदमिले,यासोबत राजकीय, सामाजिक, व्यवसायिक, सांस्कृतिक, पाहुणे, मित्र परिवार अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here