डॉ.आशिषकुमार सुना यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार
सोलापूर – पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना हे गेली पंधरा वर्षापासून मरवडे ता मंगळवेढा या ठिकाणी वैदकीय व्यवसाय करत असून मरवडे येथे सर्वसामान्य माणसाला व गोरगरिबांना अल्प दरात औषधउपचार करत असून सन 2017/18 च्या दरम्यान तळसंगी ता मंगळवेढा येथील बबन मागडे ही व्यक्ती आजारी असल्याचे सांगून उपचार करता डॉ आशिषकुमार सुना यांच्या मरवडे येथील दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आला होता त्यांच्यावर डॉ आशिष कुमार सुना यांनी वेळेत योग्य तो उपचार केला होता
त्यानंतर तीन वर्षांनी बबन मागाडे यांनी मुंबई येथे हॉस्पिटल मध्ये उपचार केल्याचे डॉ सुना यांना सांगून चार लाख रुपये दया अन्यथा तुमची बदनामी करतो तुमच्या विरुद्ध पोलीससात तक्रारी करतो तुमचा दवाखाना कायम बंद करतो असं म्हूणन चार लाख रुपये खंडणी मागितली होती याबाबत डॉ आशिष कुमार सुना यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने डॉ आशिषकुमार सुना यांच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात 2020 साली तक्रार दिली होती याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी यांनी या तक्रारी बाबत सखोल चौकशी करून डॉ आशिषकुमार सुना यांचा जबाब नोंदवून घेतला होता
परंतु बबन मागाडे यांनी डॉ आशिषकुमार सुना यांच्याविरोधात पुन्हा 17/8/2021 रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने चौकशी करण्यासाठी पोलीस पाटील मरवडे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात बोलावल्याचे सांगितले असून बबन मागाडे यांच्या वारंवार चार लाख रुपये खंडणी मागत असल्याने अखेर डॉ आशिषकुमार सुना यांनी बबन मागाडे यांच्यावर खंडणी चा गुन्हा दाखल करणे बाबत पोलीस अधीक्षक सोलापूर यांना निवेदन सादर केले आहे.
डॉ सुना यांना खंडणी मागणाऱ्या बबन मागाडे यांच्यावर खंडणी चा गुन्हा दाखल न केल्यास मंगळवेढा पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी या वेळी दिला आहे.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार संघटक धर्मण्णा गोरे कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी ( बी एस ) उपाध्यक्ष बिपीन दिड्डी प्रसिद्धी प्रमुख भास्कर वोधूल बाबा काशीद अण्णा धोत्रे संतोष खलाटे इम्तियाज अक्कलकोटकर अक्षय बबलाद युनूस अत्तार शब्बीर शेख नागनाथ गणपा प्रसाद ठक्का राम हुंडारे सतीश गडकरी बाबा कांबळे डी डी पांढरे दत्तात्रय धनके इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते