रमाई आवास घरकुल योजनेचे लाभ घेण्याचे आ. प्रणिती शिंदे यांचे आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रमाई आवास घरकुल योजनेचे लाभ घेण्याचे आ. प्रणिती शिंदे यांचे आवाहन

लष्कर बापूजी नगर येथे रमाई आवास घरकुल योजनेचे मार्गदर्शन शिबीर

सोलापूर // प्रतिनिधी 

महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जातीसाठी निवारा उपलब्ध व्हावा म्हणून रमाई आवास घरकुल योजना कार्यान्वीत केली आहे. या शिबिराचा लाभ मिळवून देण्यासाठी लष्कर जांबमुनी समाज बिल्डर क्लब येथे रमाई आवास घरकुल योजनेचे मार्गदर्शन शिबीर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने आयोजित केले होते.

यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, जेष्ठ नेते नरशिंह आसादे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगराभियंता संदीप कारंजे, माजी सभापती बसवराज म्हेत्रे, माजी नगरसेवज जेम्स जंगम, कॉंग्रेस उपाध्यक्ष हनुमंतू सायबोळू, मोची समाज माजी अध्यक्ष दिनेश म्हेत्रे, नागनाथ कासलोककर, मारुती जंगम, रमेश फुले, यल्लप्पा बुगले, वाघमारे साहेब, जगधणी साहेब, गणेश कोळी, पुजारी साहेब यांच्यासह इतर मान्यवर व महापालिकेचे व समाजकल्याण विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी लष्कर भागातील नागरिकांना रमाई आवास घरकुल योजनेची, कागदपत्रांची माहिती देण्यात आली, नवीन अर्ज भरून घेण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, शासनाने मागासवर्गीयासाठी अनेक योजना आखल्या आहेत पण लोकांपर्यंत योजनेची माहिती पोचत नाही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व शासकीय योजनेची माहिती लोकापर्यंत पोहोचवले पाहिजे, योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे. कॉंग्रेस पक्षाने मागासवर्गीय व गोरगरिबांसाठी आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी रमाई आवास घरकूल योजना सुरू केली असून मोची समाज व मागासवर्गीय समाजबांधवांनी याचा लाभ घ्यावा, लष्कर भागात गरीब कामगार, कचरा वेचणारे, बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, हातावर पोट असणारे बांधव ज्यांना रमाई आवास घरकुल योजनेची खरी गरज आहे. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांना कागदपत्रे, दाखले मिळवून देईन असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाले. घरकुल योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी कुठलेही अडचण असू द्या ते दूर करून रमाई आवास योजनेचा लाभ मोची समाज बांधव व मागासवर्गीयांना मिळवून देईन तसेच सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे रमाई आवास घरकुल योजनेचे लाभाची रक्कम 7 लाख रुपये करावे असेही मागणी केली आहे असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here