श्री दत्त भक्तांनी दिला पुरग्रस्तांना एक हात मदतीचा.!
मुंबई :- करीरोड पश्चिम येथील श्रीदत्त जयंती उत्सव मंडळ,वंदे मातरम क्रीडा मंडळ, शिवकृपा रहिवाशी संघ व आदिनाथ सांप्रदायिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, सदाशिव (भाऊ) भोसले यांच्या मार्गदर्शना खाली,सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून, नुकत्याच रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या गावांना भेट देऊन पुरग्रसतांसाठी मदत कार्य करण्यात आले. दत्त भक्तानी एकत्र येऊन, सामाजिक बांधिलकी या भावनेने रोख रक्कम, कपडे, साड्या, भांडी, शेगडी, धान्य, गुरांना पेंड (सुग्रास), जीवनावश्यक वस्तू जमा केल्या. खेड तालुक्यातील -पोसरे, दळवरने (नलावडे वाडी), चिपळूण तालुक्यातील – मिरजोळी जुवाडबेटे, गावांना भेटी देऊन जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने हे मदत कार्य केले. या मदत कार्यात सदाशिव भोसले यांच्यासह अवधूत निकम, संजय हातकर, मुकुंद निकम, संदीप काणेकर , बळीराम धामणे, राजेंद्र खांडेकर, नरेंद्र कारंडे, गोविंद शिंदे , अनिल पेडणेकर, किरण गावडे, शांताराम पावले व विश्वनाथ डाकवे यांचा मोलाचं सहभाग होता.रत्नागिरी जिल्ह्यातील पुरग्रस्ताना एक खारिचा वाटा म्हणून भेटी देऊन, त्यांना जीवना आवश्यक वस्तू दिल्या असल्याचे मनोगत सदाशिव भोसले यांनी व्यक्त केले आहे.