यंत्रमाग कामगार कल्याण मंडळात यंत्रमाग उद्योगातील काम करणाऱ्या सर्व कामगारांचे समावेश करा :- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

यंत्रमाग कामगार कल्याण मंडळात यंत्रमाग उद्योगातील काम करणाऱ्या सर्व कामगारांचे समावेश करा :- विष्णु कारमपुरी (महाराज)

 

सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या विणकर वगळून इतर सर्व कामगारांचे यंत्रमाग कल्याण मंडळात समाविष्ठ करावे. अशी आग्रहाची भुमीका महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी कामगार मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमाग कल्याण मंडळ स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत आपली आग्रही भुमीका मांडली.
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा वतीने राज्यातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या विणकर वगळून इतर सर्व कामगारांना व यार्न, वायडिंग कामगारांसाठी यंत्रमाग कल्याण मंडळात समाविष्ठ करण्यासाठी कामगार मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री. दादासाहेब भुसे यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी ऑनलाईन बैठकीत सामिल होऊन सोलापूरातील यंत्रमाग कामगार व इतर काम करणारे कामगार यांच्या समस्या मांडून ठाकरे सरकारच्या माध्यमातुन कामगार मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ साहेबांनी बॅक प्रोसेस कामगारांबद्दल कल्याण महामंडळ नेमण्याचा निर्णयाचे स्वागत केले. आणि गेल्या अनेक वर्षापासुन कामगारांना उपेक्षीत असून त्यांना या मंडळाद्वारे आधार देण्यास मदत होईल म्हणून कुठलाही विचार न करता ताबड-तोबडीने यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापना करावे. अशी विनंती केली. सदर सुचना तात्काळ मान्य करून कामगार मंत्र्यांनी कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली.
सदर बैठकीत मालेगावचे आमदार महमद इस्माईल खलीफ, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर), प्रधान सचिव कार्यालय (मंत्रायल), कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, यंत्रमाग धारक संघ अध्यक्ष :- पेंटप्पा गड्डम, चेंबर ऑफ कॉमर्सचे :- राजू राठी यांच्यासह कामगार नेते आमदार व अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here