मालकाची फसवणूक, चार नोकर अटकेत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मालकाची फसवणूक, चार नोकर अटकेत

(गंगापूरमधील कृषी सेवा केंद्रातून दोन लाखांचे कृषी साहित्य विकले)

 

शहरातील एका कृषी सेवा केंद्रातील १ लाख ९३ हजार रुपयांची कीटकनाशके देवगाव रंगारी येथील दुकानात वाहनाव्दारे परस्पर पाठवून दुकानदारांची फसवूणक करणाऱ्या एका व्यापाऱ्यासह चार नोकरांना पोलिसांनी अटक केली आहे.
व्यापारी अनिल काशीनाथ पवार, शिवम गंगाराम जगताप (रा. शिंदेवाडी), अतुल नंदु कान्हे (रा. सिरसगाव), शाहरुख मन्सूर शेख (रा. उत्तरवाडी, ता. गंगापूर), शेख रऊफ हसन (रा. गंगापूर) अशी अटक केलेल्या नोकरांचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार गंगापूर शहरात वैभव मशनरी नावाचे वैभव रवींद्र गुंदेचा यांच्या मालकीचे कृषी साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात सदर चार नोकर कामाला होते. परंतु नोकरी या
दुकानातील कृषी साहित्य परस्पर विक्री करत असल्याचा संशय गुंदेचा यांना आला. त्यानंतर त्यांनी या नोकरावर पाळत ठेवली. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी या दुकानातील काही नौकरांनी डमी ग्राहकांना दुकानावर बोलावून तीन हजार ५०० रुपये किमतीच्या आठ इंची पाइपची पावती बनवली. त्यानंतर या नोकरांनी सदर ग्राहकांना बिल बनविलेल्या पावतीऐवजी ८३ हजार रुपये किमतीचे खत व कीटकनाशक औषधी दिले. हे साहित्य ग्राहकाने छोटा हत्ती (क्र. एमएच २० ई एल ६४८३) वाहनात टाकून परस्पर लंपास केले. हा प्रकार दुकान मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी गंगापूर ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी सदर नोकरांना विश्वासात घेत त्यांची चौकशी केली असता नोकरांनी १ लाख ९३ हजार रुपयांची कीटकनाशके देवगाव रंगारी येथील किसान अँग्रो दुकानाचे मालक
अनिल काशीनाथ पवार (रा. शिंदेवाडी) यांना विक्री केल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी देवगाव रंगारी येथील सदर दुकानावर छापा मारला असता चार इंची १ पीव्हीसी पाईप, विविध कंपन्यांचे कीटकनाशक औषधी मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी छोटा हत्ती (क्र. एमएच २० ई एल ६४८३) वाहनासह १ लाख ९३ हजार रुपयांची कीटकनाशके जप्त करून पाच आरोपींना अटक करून न्यायालयता उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
हि कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोउपनि एस. जे. शेख, सहायक फौजादार गणेश काथार, पोलिस नाईक लक्ष्मण पुरी, सिमोन वाघमारे, अंमलदार बलवीरसिंग बहुरे, राहुल वडमारे, अमोल देवकाते यांनी केली. पुढील तपास पोउपनि, शकील शेख हे करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here