मिरी येथे भारतीय जनता पार्टीच्या नव्या शाखेचे उदघाटन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मिरी येथे भारतीय जनता पार्टीच्या नव्या शाखेचे उदघाटन!

 

मोहोळ तालुक्यातील मिरी येथे भारतीय जनता पार्टीच्या नव्या शाखेचे उदघाटन लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर,भाजपा किसन मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे,माजी तालुकाध्यक्ष माऊली आण्णा जगताप, मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील दादा चव्हाण, सोल्हापूर जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी क्षीरसागर म्हणाले की, मोहोळ शहरापासून थोडंस दूर असणार असं हे ठिकाण आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी पोहोचून आपलं काम करून घेणे हे इथल्या सर्वसामान्य माणसासाठी त्रासदायक होतं. या शाखेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या भागातील सर्वसामान्य माणसांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे या भारतीय जनता पार्टीच्या कार्यपध्द्तीस गती देण्याचं काम ही नवीन शाखा करणार आहे. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी अशा शाखांचा आणखी विस्तार करणार आहे.

यावेळी तालुका सरचिटणीस सतीश दादा पाटील, मुजीबभाई मुजावर, उपाध्यक्ष माऊली आप्पा भगरे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष बिरु हनमाने, सरपंच महावीर पुजारी, मिरी गावचे भाजपा नेते श्रीमंत शिंदे, शाखा अध्यक्ष निलेश पुजारी, उपाध्यक्ष राहुल मारनुर, सचिव दिलीप पाटील, संघटक रामसिंग भोई, कार्यध्यक्ष दादा भोई, खजिनदार विजय कांबळे, भाजपा कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here