रत्नदिप सोसायटी येथे 21 लाखाचे रस्ते करणे या विकास कामांचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भुमिपुजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रत्नदिप सोसायटी येथे 21 लाखाचे रस्ते करणे या विकास कामांचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भुमिपुजन

सोलापूर : सोलापूर शहरातील रत्नदिप सोसायटी येथील यलगुलवार प्रशालेकडे जाणारा रस्ता व सोसायटीमधील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत होते. यामुळे सदर सोसायटीमधील नागरीक, विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरीता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होता. यामुळे सदर सोसायटीमधील सभासदांनी सदरचा रस्ता करण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी सदर परिसरामध्ये भेट देवून पाहणी केली व तात्काळ महानगरपालिका क्षेत्रात मुलभुत सोयी सुविधांचा विकास सन 2019-2020 या योजने अंतर्गत 1) प्रभाग क्र. 16, रत्नदिप सोसायटी समोर यलगुलवार प्रशालेकडे जाणारा रस्ता करणे. (मंजूर अनुदान 13 लाख), 2) प्रभाग क्र. 16, रत्नदिप सोसायटीमधील रस्ते करणे. (मंजूर अनुदान 8 लाख) हे काम मंजूर करून घेतले व त्याचे भुमिपूजन आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यामुळे सोसायटीमधील सभासदांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांचे मनापासून आभार मानले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे गटनेता श्री. चेतन नरोटे, बी ब्लॉक अध्यक्ष श्री. बाबूराव म्हेत्रे, श्री. नरसिंह आसादे, श्री. शशीभुषन यलगुलवार, सोसायटी मधील श्री. बाळेगिरी, श्री. शिवाजी साठे, श्री. सुमित पाटील, श्री. पटेल, श्री. रेवणसिद्ध दुधनी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here