अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी पंढरपुर तालुक्याला रु.८.५० कोटीचा निधी मंजूर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी पंढरपुर तालुक्याला रु.८.५० कोटीचा निधी मंजूर

पंढरपूर तालुक्यातील आणखी ७८ गावांमधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून रू. ८.५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण समिती व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सौ. शोभा तानाजीराव वाघमोडे-देशमुख यांनी दिली. सन २०२०-२१ मधील आराखड्यानुसार पंढरपुर तालुक्याला सदर वस्त्यांच्या विकासासाठी विधान परिषदेचे आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नाने या चालू वर्षी रू.८.५० कोटी निधी पंढरपूर तालुक्यासाठी मिळाला. सन २०१९-२० मध्ये रू.५.३० कोटी व वाढीव रु.४.९० कोटी असा एकूण रू.१८.७० कोटीचा निधी तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी मिळालेला आहे,असे सौ.शोभा तानाजीराव वाघमोडे-देशमुख यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी निधी मिळाल्यामुळे सदर वस्त्यांमधील पेव्हिंग ब्लॉक, रस्ते खडीकरण, काँक्रिटचे रस्ते, पाणीपुरवठा विस्तारीकरण, आर.ओ. प्लांट बसविणे, पोहोच रस्ता खडीकरण, पाण्याची टाकी व पाईप लाईन, कॉंक्रीट रस्ता व भूमिगत गटार, समाज मंदिर दुरुस्ती, एलईडी पथदिवे, पाणीपुरवठा, बंदिस्त गटार, भुयारी गटार बांधणे, स्मशानभूमी पोहोच रस्ता, जोड रस्ता, ड्युअल पंप, सीडी वर्क, कॅनॉल मोरी बांधणे, रस्ता जोडणे यामुळे या वस्त्यांना आणखी एक नवी झळाळी मिळणार आहे.
निधी मंजूर असलेली गावे-कोर्टी रू.५ लाख, पांढरेवाडी रू.१७.७० लाख, नेमतवाडी रू.२.७० लाख, चिंचोली भोसे रू.१० लाख, टाकळी ल.रू.३० लाख, त.शेटफळ रू.१६.०५ लाख, बाबुळगाव रू.१५ लाख, उंबरगाव रू.८ लाख, खेडभोसे रू.७ लाख, तिसंगी रू.१२ लाख, तारापूर रू.६.७५ लाख,शेगाव दु.रू.३ लाख, भाळवणी रू.३८.३५ लाख, आढीव रू.१५ लाख, पिराची कुरोली रू.११.७० लाख, पटवर्धन कुरोली रू.७.९५ लाख, शिरढोण रू.३ लाख, कौठाळी रू.९ लाख, पुळुज रू.१७.०५ लाख, भंडीशेगाव रू.९.७० लाख, शेवते रू.३.५० लाख, धोंडेवाडी रू.१७ लाख, मेंढापूर रू.२०.४० लाख, अनवली रू.५.७० लाख, सुस्ते रू.९.४५ लाख, ईश्वर वठार रू.४.७० लाख, गोपाळपुर रू.११.३५ लाख, रांझणी रू.९.७० लाख, खर्डी रू.२१.७० लाख, अजोती रू.२ लाख, पळशी रू.२०.७० लाख, कान्हापुरी रू.८ लाख, नांदोरे रू.५ लाख, करकंब रू.४० लाख, आंबे रू.१४ लाख, करोळे रू.१ लाख, शेळवे रू.१४.७० लाख, पुळूजवाडी रू.२ लाख, ओझेवाडी रू.१२ लाख, केसकरवाडी रू.४ लाख, रोपळे रू.५ लाख, गादेगाव रू.४० लाख, सिद्धेवाडी रू.१५ लाख, गुरसाळे रू.१३.३५ लाख, उंबरे पा. रू.९ लाख, सरकोली रू.१४.३५ लाख, भोसे क. रू.२८ लाख, कासेगाव रू.३९.७५ लाख, बोहाळी रू.८.७० लाख, पेहे रू.७.७० लाख,. शंकरगावनळी रू.५.९० लाख, वाखरी रू.१६.३५ लाख, चळे रू.८ लाख, शेवते रू.२.७० लाख, देगाव रू.६.३५ लाख, जळोली रू.१७.५० लाख, फुलचिंचोली रू.५.४० लाख, बिटरगाव रू.४.३५ लाख, कोंढारकी रू.६.३५ लाख, सुपली रू.९.३५ लाख, गार्डी रू.१५.४० लाख, ऊपरी रू.१२.३५ लाख, देवडे रू.५ लाख, खरसोळी रू.३ लाख, वाडीकुरोली रू.६ लाख, करोळे रू.३ लाख, एकलासपूर रू.३ लाख, भटुंबरे रू.५ लाख, खरातवाडी रू.४ लाख,आंबे. चिंचोली रू.३.३५ लाख, तावशी.रू.९ लाख, नारायण चिंचोली रू.३ लाख, अजनसोंड रू.१.३५ लाख, मगरवाडी रू.३ लाख, सोनके रू.१५.३५ लाख, तुंगत रू.५ लाख, विटे रू.३ लाख असा एकूण रु.८.५० कोटीचा निधी समाज कल्याण विभागाच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला.
नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्यामुळे निश्चितच वरील वस्त्यांमध्ये सुधारणा व विकास होणार असून तेथील नागरिकांच्या गैरसोई दूर होऊन राहणीमानामध्येसुद्धा निश्चितच सुधारणा होणार असल्याचे यावेळी समाजकल्याण समिती सदस्य मा.श्री.अतुल खरात, पंचायत समितीच्या सभापती मा.सौ.अर्चना व्हरगर, उपसभापती मा.सौ.राजश्री भोसले यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here