राधानगरीच्या भर चौकात घडला थरार!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राधानगरीच्या भर चौकात घडला थरार!

(गाडी मागे घेण्याच्या कारणावरुन गंभीर स्वरूपाची मारहाण)

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

चार चाकी गाडी मागे घेण्याच्या वादातून खासदार संजय मंडलिक यांचा समर्थक मच्छीन्द्र काटकर आणि त्यांच्या चौघा साथीदारांच्या कडून राजाराम कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोखे यांच्या पुतण्यास गंभीर अशी मारहाण करण्यात आली. जखमी सुमित साळोखेला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती काहीशी चिंताजनक असून सुमितच्या डोक्याला तब्बल बारा टाके पडले आहेत.

वरकरणी ही घटना गाडी मागे घेण्यावरून झाली अशी दिसते मात्र त्याला राजकीय वैर कारणीभूत आहे. संशयित मच्छीन्द्र काटकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तो कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे. राधानगरीच्या मुख्य चौकात झालेल्या हल्ल्याने राधानगरीमध्ये थोडं भीतीच वातावरण पसरलं आहे. मच्छीन्द्र आणि त्याचा साथीदारांच्यावर राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टोकाच्या राजकीय वैरापायी गंभीर गुन्हा करण्याची धाडस करण्याऱ्या मच्छीन्द्र आणि त्याच्या साथीदारांना कडक शासन व्हायला हवं आणि कोणत्याही राजकीय नेत्यांनी अश्या गुन्हेगारास पाठीशी घालू नये अशी प्रतिक्रिया राधानगरीवासीयांच्या कडून व्यक्त होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here