रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने गुजर हॉस्पिटलवर कारवाईची मागणी..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने गुजर हॉस्पिटलवर कारवाईची मागणी..!

माळशिसर तालुक्यातील अकलूज येथील प्रसिद्ध अशा गुजर हॉस्पिटल अॅन्ड maternity होम या हॉस्पिटलवर रुग्ण हक्क परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष,श्री संजय लोहार व सोलापूर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्री राजू टिंगरे यांनी गुजर हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यायी अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा पोलिस अधिक्षक, सोलापूर जिल्हा अधिकारी, तसेच सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार स्वरूपात निवेदन देण्यात आले.

सविस्तर असे की, करमाळा तालुक्यातील भिवरवाडी येथील श्री भाऊसाहेब शेळके यांनी स्वतः वडिलांना दिनांक आठ एप्रिलरोजी गुजर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते.

या उपचारादरम्यान डॉक्टर गुजर यांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा करून , अर्धवट उपचार देऊन रुग्ण घरी हाकलून दिले व त्यानंतर तीस ते चाळीस तासाच्या अंतराने रुग्ण दगावला अशी तक्रार कै. रोहिदास शेळके यांच्या मुलगा भाऊसाहेब शेळके यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री संजय लोहार यांच्या बरोबर संपर्क साधून घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली असता त्यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शेळके कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे तरी गुजर हॉस्पिटल वर भा.द.वि. कलम 304A नुसार कारवाई करण्याची मागणी या निवेदनात म्हणटले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here