सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी प्रभाग 4 व 8 मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत निकृष्ठ व संथगतीने होणाऱ्या कामाची पाहणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी प्रभाग 4 व 8 मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत निकृष्ठ व संथगतीने होणाऱ्या कामाची पाहणी

स्मार्ट सिटीचे CEO त्रंबक ढेंगळे पाटील यांच्याबरोबर पाहणी करून काम चांगल्या दर्जाचे व लवकर करण्याच्या सूचना केल्या.

सोलापूर // प्रतिनिधी 

प्रभाग 4 व 8 मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहेत. तसेच होणारे कामे निकृष्ठ व संथगतीने होत असल्याच्या तक्रारी तेथील नागरिकांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्याकडे केली. यामुळे नागरिकांना अतिशय त्रास होत आहे. शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी स्मार्ट सिटी चे CEO त्रंबक ढेंगळे पाटील यांना प्रभाग 4 व 8 मध्ये बोलावून घेऊन त्यांच्यासमवेत होणाऱ्या कामाची पाहणी पाहणी करून काम चांगल्या दर्जाचे व लवकर करण्याच्या सूचना केल्या. लवकरात लवकर कामे पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
यावेळी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here