पावसाळ्यात गोठ्याची स्वच्छ्ताअत्यावश्यक-कृषीकन्या मानसी गोडसे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पावसाळ्यात गोठ्याची स्वच्छ्ताअत्यावश्यक-कृषीकन्या मानसी गोडसे

 

पावसाळ्यात वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी,जिवाणू,विषाणू यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो व त्याचा विपरीत परिणाम गुरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होतो असे मत कृषीकन्या मानसी मधुकर गोडसे हिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित,रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत व्यक्त केले.
पावसाचे पाणी गोठ्यातील शेण,मुलमुत्र यामध्ये मिसळून गोठ्यात दुर्गंधी पसरते आणि जनावरे वेगवेगळ्या आजाराला बळी पडतात आणि त्याचा थेट परिणाम जनावरांच्या दूध उत्पदनावर होतो आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते असे होऊ नये म्हणून गुरांच्या गोठ्याची स्वच्छ्ता ही अत्यावशयक असते. गोठ्याची स्वच्छ्ता कश्या प्रकारे व वेळोवेळी केली पाहिजे तसेच निर्जंतुककरण करणे ही आवश्यक आहे असे मार्गदर्शन कृषीकन्या मानसी हिने शेतकऱ्यांना केले त्याकरिता तिला विषय शिक्षक प्रा.डी.एस.मेटकरी तसेचत्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यावेळी कान्हापुरी गावातील शेतकरी पोपट फराडे,सोमनाथ शिंदे, शुभम फराडे, संतोष फराडे,रमेश फराडे इ शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here