अवैध रित्या दारू विक्री?सफाळे पोलीस ठाणे व्दारा कारवाई

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अवैध रित्या दारू विक्री?

सफाळे पोलीस ठाणे व्दारा कारवाई

  • प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

सफाळे:- दिनांक ६ जुलै २०२१ रोजी रोडखड पाडा सफाळे पुर्व येथील राजेश किराणा स्टोअर येथे अवैध रित्या कोणत्याही प्रकारचा दारू विक्री, साठवून ठेवण्याचा परवाना नसताना, स्वतःच्या फायद्यासाठी नाहरसिंह देवीसिंह राजपूत वय वर्षे ३८ हा दारू विक्री करीत असल्याची माहिती, सफाळे पोलीस ठाणे येथील कार्यरत प्रभारी अधिकारी आणी कर्मचारी यांना मिळाली असताना, पाहणी करण्यासाठी ६ जुलै २०२१ रोजी अंदाजे दुपारी २ – ३० च्या दरम्यान राजेश किराणा स्टोअर रोडखड पाडा येथे गेले असताना,दुकानाची झाडा झडती करून पाहणी केली असताना. दुकानात अंदाजे २६,२७६ /- रूपये किमतीचा विक्री साठी अवैध रित्या ठेवलेला दारूचा मुद्देमाल मिळून आला आहे. तो खालील प्रमाणे
१) Kingfisher Strong बिअर ६५० एम एल १२ बोटल
२) London Pilsner माईल्ड ६५० एम एल १२ बोटल
३ ) London Pilsner Strong बीअर ६५० एम एल १२ बोटल
४) London Pilsner Strong ५०० एम एल २४ टिन
५) London Pilsner प्रिमियम बियर ५०० एम एल २४ टिन
६) McDonald’s no 1 व्हिस्की १८० एम एल २६ बोटल काचेच्या
७) Imperial Blue व्हिस्की १८० एम एल २३ बोटल काचेच्या
८) DSP Black १८० एम एल ५४ बोटल काचेच्या असा एकूण मुद्देमाल विनापरवाना कब्जात बाळगला असताना मिळून आला असताना सफाळे पोलीस ठाणे येथे गुन्हे रजि नं lll ४३ / २०२१ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ( ई ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना स्थळी सफाळे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे सहा, पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली असून वरिष्ठ अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली व संदिप कहाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तपासी अंमलदार श्री के बी शेळके पुढील तपास करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here