सचिवास 100 रूपयांची लाच घेताना पकडले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सचिवास 100 रूपयांची लाच घेताना पकडले

नायगाव;तालुक्यातील मौ.मरवाळी ता.नायगांव येथील सेवा सहकारी सोसायटीचा गट सचिव श्री शेख हैदरसाब याला १००/- रुपयाची लाच स्वीकारताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, दिनांक १५/०६/२०२१ रोजी यातील तक्रारदार यांनी तक्रर दिली की, “तक्रारदार यांना सेवा सहकारी सोसायटी लिमीटेड,मौजे.मरवाळी ता.नायगांव जि.नांदेड येथुन बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी सदर सोसायटीचा सचिव शेख हैदरसाब हा १००/- रू. लाचेची मागणी करीत आहे.तक्रारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड कार्यालयाकडुन दिनांक ०३/०७/२०२१ रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये सचिव शेख हैदरसाब याने तक्रारदार यांचेकडे उपरोक्त कामासाठी १००/- रु. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून आजच दिनांक ०३/०७/२०२१ रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक,शाखा रातोळी ता.नायगांव चे परिसरात लावण्यात आलेल्या सापळया दरम्याण सचिव शेख हैदरसाब यांने तक्रारदार यांचेकडुन उपरोक्त कामासाठी १००/- रू. लाचेची रक्कम स्विकारली म्हणुन श्री शेख हैदरसाब हुसेनसाब, वय ४८ वर्ष,व्यवसाय नोकरी- गट सचिव-सेवा सहकारी सोसायटी लिमीटेड,मौजे.मरवाळी,ता. नायगांव रा.रातोळी ता. नायगांव जि. नांदेड नांदेड याचे विरुध्द पोलीस ठाणे नायगांव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उप अधिक्षक श्री विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पो.ना किशन चिंतोरे, जगन्नाथ अनंतवार, अमरजितसिंह चौधरी, मारोती सोनटक्के यांनी पार पाडली आहे.
तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here