सोलापूरात मराठा आक्रोश मोर्चाला; मोठा पोलीस बंदोबस्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूरात मराठा आक्रोश मोर्चाला; मोठा पोलीस बंदोबस्त

छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचा समारोप

सोलापूर // प्रतिनिधी

माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे चौकातून दु. १ च्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली असून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले आहेत.
या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून मराठा समाजबांधव मोठ्या प्रमाणात गाडीने रवाना झाले असता सर्व ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेट्स लावून नाकाबंदी केले असले तरी मोर्च्यात सहभागी झाले आहेत.
या मोर्चात खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजय देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, तसेच पाटील आटोमोबाईल चे मालक सुधीर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले आहेत.
सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन येथेच मोर्चाचा समारोप करण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here