कोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज  

          

सोलापूर // प्रतिनिधी 

अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 आजाराने मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.            

मृत्यू झालेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी उपजीविका आणि उपक्रमांसाठी मार्जिनलाइज्ड व्यक्तींसाठी समर्थन (Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE)) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना आहे. 

योजनेची माहिती आणि अटी व शर्ती            

तपशील / प्रकल्प (मूल्य रुपये 1.00 लाख ते 5.00 लाखापर्यंत) (एन.एस.एफ.डी.सी.) सहभाग 80 टक्के, भांडवल 20 टक्के, व्याजदर 6 टक्के, परतफेडीचा कालावधी 6 वर्षे आहे.

पात्रता

  • अर्जदार अनुसूचित जातीतील असावा.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3.00 लाखापर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्य असावा. (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदस्याचे नाव असणे बंधनकारक).
  • मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे वय 18 ते 60 दरम्यान असावे. 
  • मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 
  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पुढीलपैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत.
  • महानगरपालिका / नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती. एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र.

आवश्यक कागदपत्रे           

मृत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लाखापर्यंत),  कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला,  रेशनकार्ड, वयाचा पुरावा.           

कोविड – 19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने संपूर्ण माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा या लिंकवर http://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 भरण्यात यावी, असे जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) सोलापूर यांनी कळविले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here