अभिजीत पाटलांची तोफ आज देगावात धडाडणार. अभिजीत पाटलांना साथ देऊया जुने दिवस परत आणूया कामगार व सभासद शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक देणाऱ्या कथित कारखानदारांना त्यांची जागा दाखवुया चला सभासदांची सत्ता आणूया. (आज सायंकाळी ठीक ७ वाजता)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूकीत यंदा प्रथमच मोठी रंगत आणि चुरस पाहायला मिळत आहे.सत्ताधारी गटाला थेट आव्हान देऊन विरोधात दंड थोपटणारे अभिजीत पाटील या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत.यात अभिजीत पाटलांनी सत्ताधारी गटाच्या मातब्बर साखर सम्राटांना थेट आव्हान दिले आहे.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या जीवावर पाच वर्षात ४ कारखाने यशस्वीपणे चालवत त्यांनी कथित कारखानदारांच्या कथेलाच सुरुंग लावला.साखर कारखानदारी दाखवली जाते तेवढी अवघड नाही.योग्य नियोजनाच्या आधारे कारखाना चालवला तर किती चांगल्या प्रकारे चालू शकतो ही अगदी सोप्या भाषेतील व्याख्या त्यांनी तमाम महाराष्ट्राला दाखवून दिली.नुसती कारखानदारीच नाही तर सामाजिक क्षेत्रातील या तरुणाचे योगदान आज अनेक प्रस्थापित लोकांना हादरे देत आहे.त्यामुळे आपण झाकोळले जाऊ या भीतीने कार्यशून्य कथित नेते त्याला विरोध दाखवत आहेत.तो कसा चुकतो आहे हे सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत.पण या नादात ते हे विसरले आहेत की काम करणारच चुकतो.आणि आपण स्वतः तर १२ वर्षे सत्तेत राहुनही कारखाना बंद पाडण्याशिवाय एकही काम व्यवस्थितपणे करू शकलेलो नाही.त्यामुळे कारखाने बंद पाडून, कामगारांना जेलमध्ये टाकून, लोकांची उसाची बिले बुडवून,कामगारांचे पगार थकवून संसार उघडे पाडून निर्लज्जपणे उघड माथ्याने मते मागत फिरणाऱ्या या नेत्यांना आता जनतेने धडा शिलवण्याची वेळ आली आहे. या कथित नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली तरच विठ्ठल कारखाना पुन्हा जोमाने सुरू होणार आहे.पुन्हा चांगले दिवस यायचे असतील तर आपण सर्वांनी अभिजीत पाटील या तरुणाच्या मागे उभे राहावे लागेल.हा तरुण आपल्यासाठी लढतोय आपल्या पुढच्या पिढीसाठी लढतोय.काल श्री बी पी रोंगे सरांची व सर्व शेतकरी संघटना त्यांना साथ मिळाली असल्याने त्यांचे बळ अजून वाढले आहे.चला आपणही त्याला साथ देऊन त्याचे बळ वाढवुया आणि खोट्या विरुद्ध खऱ्याची ही लढाई जिंकून दाखवुया… आज त्यांच्या जन्म गाव देगावपासून त्यांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here