खासदार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल! शेतकऱ्यांचे हित पाहून “भीमा”ची निवडणूक बिनविरोध करावी:खा.धनंजय महाडिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून कारखान्याचे चेअरमन खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर येथे मोठे शक्ती प्रदर्शन करीत असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल केला.

खा.महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज भैय्या महाडिक यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे.

यावेळी बोलताना खा.महाडिक म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी भाजपचे नेते प्रशांत परिचारक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन पाटील यांनी भीमा सहकारी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी व ते यावर विचार करतील अशी माहिती विनंती राज्यसभा खासदार मा.धनंजय महाडिक यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी पृथ्वीराज महाडिक,विनोद महाडिक,पवन भैय्या महाडिक, भाजपाचे नेते संजय आण्णा क्षीरसागर, भाजपाचे सुनील चव्हाण, शिवाजी गुंड पाटील, प्रा.संग्राम चव्हाण,कारखान्याचे व्हा.चेअरमन सतीश आण्णा जगताप, संचालक दिलीप रणदिवे, अनिल गवळी, अर्जून चव्हाण, प्रा.राजकुमार पाटील, सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व सर्व असंख्य कार्यकर्ते आदी मान्यवर व महाडिक प्रेमी याप्रसंगी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here