टुकार टोळीची टूरटूर थांबवा! भीमा बिनशर्त बिनविरोध मुन्ना साहेबांच्या ताब्यात द्या! -प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब


शेतकऱ्यांची थकित बिले व कामगारांच्या पगार मागणी हा उद्देश जरी चांगला असला तरी भीमा बचाव समितीचा त्यामागील कारखाना बंद पाडून खा.धनंजय महाडिक यांना बदनाम करून सत्तेसाठी ‘वाट्टेल ते’ करून सत्ता हासिल करणे हा लपलेला

हेतू वाईटच होता.विरोधकांनी भीमाच्या सभासद कामगारांना उपोषण- आंदोलने करण्यासाठी ऊकसवण्याचे काम नेहमी केले.
त्यामुळे सभासदांमधे संभ्रम निर्माण होऊन संस्था नाहक बदनाम झाली होती.सभासद कमी करण्याच्या रडीच्या डावाला प्रथम सुरवात विरोधकांनी केली.थकहमी देऊ नये यासाठी सरकार व कर्जे देऊ नये म्हणून बँकांकडे तक्रारी केल्या,गोडा-

ऊनमधली साखर गायब असल्याचा धादांत खोटा आरोप तसेच एक्सपान्शन व कोजनरेशन अपूर्ण असल्याचा आरोप केले.संस्थेवरील कर्जाचे आकडे चौपट फुगवून सांगून सभासदांना गोंधळवून टाकले.अशा खालच्या स्तराच्या खोड्या करून, कृत्ये करून सभासदांच्या मालकीची संस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.परंतु टुकार चिल्लर पार्टीच्या टिकेला न जुमानता महाडिक साहेबांनी हिम्मतीने एक्स-पाॅन्शन
सह को-जनही सुरू करून 18 कोटिंची वीजपण विकून दाखवून यंदाचा हंगामही यशस्वी करून दाखवत 5 लाख टन उसाचे नुसते गाळपच करून दाखवलं नाही तर गाळलेल्या संपूर्ण ऊसाचे बील वाटपही करून दाखवून ते “विरोधकांना पूरून उरले.”आता विरोधक तोंडावर पडले असून त्यांच्याकडे निवडणूक लढण्यासाठी एकही मुद्दा राहिलेला नसून सभासदांनी त्यांचा सत्तास्वार्थाचा वाईट हेतू पूर्ण ओळखला असून सध्या चालू असलेली विरोधी टुकारांच्या टोळीची
टूर-टूर त्यांच्या नेतृत्वाने नाही थांबविली तर आगामी निवडणुकीत भीमाचे सुज्ञ सभासद व कामगारच ती थांबवतील व या परिसराची आन बान आणि शान असलेल्या भीमावर वाकडी नजर ठेवणाऱ्या प्रवृत्तींचे मनसुबे उधळून लावत त्यांना धूळ चारल्याशिवाय ते राहणार नाहीत. सत्तेसाठी सैरभैर व आंधळ्या झालेल्या हावरट विरोधकांना ते काय पाप करत आहेत याचे भान राहिलेले नाही.भीमा कारखाना बंद पाडण्याचा त्यांचा डाव यशस्वी झाला असता तर भागातील ऊसाची “चिपाडं”झाली असती व हजारो कुटुंबांच्या चुली विझल्या असत्या! या भयानक वास्तवाची वाचाळ बचाव समितीला पर्वा राहिली नव्हती. कै.भीमराव दादांनी स्थापन केलेल्या भीमा कारखान्या विषयी खरी आस्था फक्त त्यांचे चिरंजीव खा.मुन्ना साहेब यांनाच असू शकते म्हणूनच त्यांनी स्वतःची वडिलोपार्जित संपत्ती गहाण ठेवून भीमाचा यंदाचा गाळप हंगाम यशस्वी करून दाखवला याची जाणिव भीमाच्या प्रत्येक सभासदाच्या मनात कायम राहील. भीमा हा कारखाना फक्त महाडिक यांच्या हातामध्येच सुरक्षित राहू शकतो.वेळ पडल्यास भीमाचं धडंभलं करण्यासाठी स्वतःची वडिलो- पार्जित जमीन गहाण ठेवून भांडवल उभा करण्याचे धाडस व भावना फक्त भीमरावदादांचे चिरंजीव असलेले खा.मुन्नासाहेब हेच दाखवू शकतात.हिच सर्व सभासदांची मनोमन भावना असून भीमा पुन्हा एकदा महाडिक साहेबांच्याच हातात देण्याचा प्रत्येक सभासदाचा निर्धार पक्का झालेला आहे. विरोधकांनी निवडणूक लादल्यास त्यांना सपशेल पराभवाला सामोरे जावे लागेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यापेक्षा त्यांनी भीमा कारखाना बिनशर्त बिनविरोध करून तो महाडिक साहेबांच्या ताब्यात द्यावा व जुन्या उपकाराची परतफेड करून तालुक्यामध्ये निरोगी राजकारण वाढीस लावावे. महाडिक साहेबांनी पंधरा वर्षापूर्वी स्वतःच्या वडिलांनी स्थापन केलेला कारखाना आ. सुधाकर पंत परिचारक आ.राजन पाटील यांच्याकडे बिनविरोध सोपविण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला होता..याची मनात जाणीव ठेवावी व भीमा कारखाना बिनशर्त बिनविरोध महाडिक साहेबांच्या कडे सुपूर्द करावा व जुन्या उपकारांची परतफेड करावी महाडिक साहेबांनी तसे खुले आवाहनही व्यासपीठावरून केले आहे.असे महत्वाचे प्रतिपादन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण यांनी भीमा कारखाना महाडिक यांच्या सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व संचालक मंडळासह पंढरपूर मोहोळ तालुक्यातील आदी मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होती.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here