धनंजय महाडीक हे परमनंट खासदार! (द रियल हिरोचा भीमा परिवाराला अभिमान!) प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये राज्यसभा ह्या कधीही विसर्जित न होणार्या व कायम सभागृह म्हणून परमनंट हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यसभेवर भीमा परिवाराचे सर्वेसर्वा श्री.धनंजय महाडीक यांची बहुमताने निवड झाल्यामुळे  इथून पुढे ते देशात “परमनंट खासदार ” म्हणून ओळखले जातील.फक्त तज्ञ अभ्यासू,असामान्य क्षमतेचे,अनुभवी बुद्धिमान प्रतिनिधीच राज्यसभेवर निवडून जातात असा आजवरचा इतिहास आहे. स्वर्गीय लालबहादूर शास्त्री सर्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवाणी,अरुण जेटली यांसारखे दिग्गज राज्यसभेवर निवडून गेले आहेत. असे अभ्यासू प्रामाणिक अनुभवी लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम करणाऱ्या धडाडीच्या खास दारांना त्यांच्या क्षमतेचा देशाच्या विकासासाठी उपयोग व्हावा म्हणून वारंवार संसदेवर खासदार म्हणून पाठवता यावे यासाठीच राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाची निर्मिती झालेली आहे. ‘बाळाचे पाय पाळण्यात’दिसतात या म्हणीप्रमाणे धनंजय महाडिक यांनी लोकसभेवर पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेल्यावर आपल्या “डॅशिंग परफॉर्मन्सने” संसदेवर कायमची मोहोर उमटवली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच शरद पवारसाहेब,
ना.गडकरीसाहेब,खा.सुप्रियाताई सुळे यासह देशातील अनेक अनुभवी व दिग्गज मंत्री महोदयांनी संसदे मधील युवा नेतृत्व खासदार धनंजय महाडिक यांचे वेळोवेळी तोंडभरून कौतुक केले आहे. या उल्लेखनीय कामगिरी साठी त्यांना सलग तीन वेळा संसदरत्न खासदार हा पुरस्कार मिळाला. कोणताही राजकीय पक्ष म्हणजे सत्तेपर्यंत पोहोच ण्याचे एक माध्यम असते. अंतिम ध्येय हे लोकसेवा व देशाचा विकास हेच असते. महाडिक साहेबांचा भीमा परिवार हा सर्वपक्षीय परिवार असून त्यांनी मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाचा भीमा परिवाराच्या प्रत्येक सदस्याला अभिमान आहे. खासदार मुन्ना साहेब हे भीमा परिवाराची अस्मिता असून त्यांच्या पुढील राजकीय प्रवासामध्ये संपूर्ण भीमा परिवार त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहील. विरोधकांनी निर्माण केलेल्या अनंत अडचणींवर मात करून यंदाचा हंगाम यशस्वी करून दाखवून भीमा परिवाराचे मुन्ना साहेब हे “द रियल हिरो” ठरलेले आहेत. आज त्यांचा विमा परिवाराच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार आम्ही करत आहोत.असे गौरवोद्गार प्रा.संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले. याप्रसंगी व्हा. चेअरमन सतीश जगताप व सर्व संचालक मंडळ शिवाजी गुंड पाटील भारत पाटील,राजेश बाबर पांडुरंग ताटे जाकिर मुलानी, सुनील चव्हाण,संतोष चव्हाण,विकिल चव्हाण,नाना पवार,सज्जन पवार, बापूसाहेब चव्हाण, सुखदेव चव्हाण, विजय बाप्पा चव्हाण, गणेश चव्हाण, एडवोकेट विजय नागटिळक, माउली जाधव,प्रमोद जाधव,प्रशांत जाधव भारत जाधव,शत्रुघ्न जाधव,संभाजी माने तानाजी सुतकर, चरणराज चवरे,रमेश माने,संभाजी कोकाटे, हनुमंत पाटील, भैय्यासाहेब देशमुख, प्रा.राजकुमार पाटील, किसन जाधव,धनु देशमुख,लियाकत तांबोळी, पै.अन्सार भाई,सिद्धेश्वर अनुसे, पोपट सोनटक्के, भीमराव वसेकर, भाऊ वसेकर,प्रशांत वसेकर, समाधान वसेकर,बंडू अनुसे दत्ता कोरे ,समीर ताटे आदि मान्यवर उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here