नासा मधील रॉकेट वुमन कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये. प्रसिद्ध शात्रज्ञ अनिमा पाटील साधणार विद्यार्थ्यांशी संवाद.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) येथील जॉनसन स्पेस सेंटर, अमेरिका मधील प्रसिद्ध शात्रज्ञ अनिमा पाटील- साबळे या कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथील विद्यार्थ्यांशी दिनांक 28 मे 2022, शनिवार, सायं. साडे सहा वाजता ऑनलाइन संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. “ट्रावेलिंग टु मून, मार्स अँड बियॉन्ड…” या विषयावर त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक वर्गांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील व संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी दिली.
मूळ च्या भारतीय वंशाच्या असणार्‍या अनिमा पाटील या अमेरिकेतील नासा या संस्थेमध्ये जॉनसन स्पेस सेंटर मध्ये प्रोजेक्ट लीडर म्हणून कार्यरत आहेत. नासा ही एक संयुक्त राज्य अमेरिकाची स्वतंत्र शाखा आहे, जी उपग्रहाच्या माध्यमातून आकाशामध्ये संशोधन करते. आणि माहिती घेण्यासाठी अवकाशामध्ये अंतरिक्ष यान पाठवते. नासाचे मुख्य काम अवकाशाविषयी संशोधन करणे हेच असते. विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक ज्ञानाला चालना मिळावी त्यामध्ये भर पडून नवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यानी कास धरुन त्यासाठी त्यांनी उद्युक्त व्हावे या हेतूने कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये असे विविध उपक्रम नेहमीच घेतले जातात. अमेरिकेतील नासा मधील प्रसिद्ध क्षात्रज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी असून विद्यार्थी व पालक वर्गामद्धे प्रचंड आनंदाचे वातावरण असून सर्व पालक व विद्यार्थी अश्या उपक्रमाविषयी महाविद्यालयाचे कौतुक करताना दिसत आहेत. सदरचा कार्यक्रम हा ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच यू ट्यूब लाईव्ह व फेस बूक लाईव्ह वरुन प्रदर्शित होणार आसून विद्यार्थी,

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here