बहुजन सत्यशोधक संघ माढा तालुका उपाध्यक्षपदी संतोष जानराव यांची निवड.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष. मा. सुनील जी ओहोळ साहेब यांच्या आदेशानुसार. जिल्हा अध्यक्ष युवक अध्यक्ष महादेव गाडे यांनी केली. यावेळी प्राध्यापक यशवंत बडेकर म्हणाले की बहुजन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षे ची तयारी करावी ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणी येतील त्या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करू बहुजन सत्यशोधक संघ हे संघटन महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने वाढत असून युवक वर्ग संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात सामील होत आहे, एसटी. एसटी वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केले जात असल्यामुळे, महिला विद्यार्थी बेरोजगार वीट बिगारी हा वर्ग मोठ्या प्रमाणात सामील होत आहे भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी करणे हे उद्देश घेऊन संघटनेची वाटचाल चालू आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बहुजनांना न्याय देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाईल. युवकांनी शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घराघरांमध्ये पोहचवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करावे असे ते म्हणाले.. बहुजन सत्यशोधक संघाचे नेते. आबासाहेब पाटोळे म्हणाले की ओबीसींची जातीनिहाय जनगणना तात्काळ शासनाने करावी. एस सी एस टी चे पदोन्नती तील आरक्षण तात्काळ शासनाने लागू करावे. शासनाने सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ सर्वांना मिळेल याची दक्षता घ्यावी. बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता चालू करावा. शासनाने सर्व क्षेत्रातील खाजगीकरण थांबवावे. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गतभूमिहीना तात्काळ जमिनीचे वाटप करण्यात यावा,अनेक मुद्यांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.. यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष महादेव गाडे. अनिल , सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे. बापूसाहेब शिंदे जिल्हा अध्यक्ष कर्मचारी संघ. बेंड शहराध्यक्ष महेंद्र शिंदे. तालुका युवक अध्यक्ष सुरेश वाघमारे. संतोष वाघमारे. आप्पासाहेब ओहोळ. जब्बार बालाजी लोखंडे.दीपक ओहोळ. रवि ओहोळ. वेतला ओहोळ. सिद्धेश्वर वाघमारे.इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या वेळेस उपस्थित होते..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here