श्री. दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा घ्या प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा -प्रा.संग्राम चव्हाण (जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उजनी धरणातून इंदापूरला 2 टीएमसी पाणी चोरून नेण्याच्या मुद्द्याविरूद्ध काही दिवसापूर्वी संपूर्ण सोलापूर जिल्हा पेटून उठला होता. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने निकराचा लढा उभा करून उग्र आंदोलने केली होती.याची दखल घेत खुद्द जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सरकारच्या वतीने लेखी आश्वासन दिले होते व हा निर्णय रद्दही केल्याचे जाहिर केले होते.या गोष्टीला फार काळ लोटला नसताना तोपर्यंत त्याच योजनेसाठी 350 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे समोर आले. सोलापूर जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच लहान मोठ्या शहरांसह सर्व खेड्यातील पाणी पुरवठा योजना या उजनी धरणा वरच पुर्णपणे अवलंबून असून महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेती ही फक्त आणि फक्त उजनी धरणावर अवलंबून असून धरणाचे पाणी जिल्ह्यातील शेतीसाठी व पिण्यासाठी पुरत नाही.एखाद्या वर्षी जरी पावसाची सरासरी थोडीशी जरी खाली आली तरी जिल्ह्यातील पिके जळून जातात व पिण्याच्या पाण्याचीही प्रचंड टंचाई तयार होते.ही वस्तुस्थिती सर्वांना माहित आहे.उजनी धरणाच्या सध्याच्या पाणी साठ्यामध्ये जर आणखी वाटेकरी झाले तर जिल्ह्यातील लाखो लोक पिण्याच्या पाण्याविना तडफडू शकतात व हजारो हेक्टर शेतीमधील पिके उद्ध्वस्त होतील व आधीच अडचणीत असलेले सर्व शेतकरी देशोधडीला लागतील. हे विदारक सत्य सरकारला माहित असताना पालकमंत्री पुन्हा-पुन्हा स्वतःच्या मतदार संघात पाणी चोरून नेण्याचा प्रयत्न का करतात? हा पोरकटपणा नाही का? तसेच सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती असलेले अत्यंत जबाबदार नेते म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे दोघेही श्री. भरणे यांच्या पोरकट पणाला साथ कशी काय देऊ शकतात? असा संतप्त सवाल सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शेती विषयाचे सखोल अभ्यासक प्रा.संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला. ते पुढे म्हणाले, “कागदोपत्री उजनी धरणाचे पाणी शिल्लक दिसत असले तरी ते पाणी प्रत्यक्ष पातळीवर जिल्ह्या तील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी पुरत नाही.राज्याचे मुख्यमंत्री,उप- मुख्यमंत्री,जल- संपदामंत्री व पालकमंत्री या सर्वांनी मिळून सोलापूरच्या शेतकऱ्यांचा विश्वास घातच केला आहे. वाटेल ते झाले तरी चालेल पण सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागेलच! आमच्या हक्काच्या पाण्यावर जर कोणी डोळा ठेवाल तर इथला शेतकरी डोळे काढून घ्यायला कमी करणार नाही” याप्रसंगी अनेक शेतकरी उपस्थित होते त्यांच्याही प्रतिक्रिया अत्यंत संतप्त होत्या.

चौकट
दत्तात्रय भरणेमामा आता बास्स!चलेजाव!
स्वतःच्या मतदारसंघा मधील अस्तित्व टिकवण्या साठी सोलापूरचा शेतकरी संपवायला निघालेल्या पालकमंत्री श्री.भरणे यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. भरणे मामा आपल्या चुकीच्या पाऊला मुळे सोलापूर जिल्ह्यात महाविकासआघाडी बदनाम होत आहेत याची दखल घ्यावी. जिल्ह्याच्या प्रश्नांची चांगली जाण असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पालक मंत्री पदाची जबाबदारी सोपवावी. श्री.भरणे यांची मनमानी शेतकर्यांच्या भावनांशी खेळ आता जिल्ह्यातला शेतकरी कदापि सहन करणार नाही.श्री.भरणे यांना सर्व शेतकरी ‘चले जाव’असा इशारा देत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here