केतकी चितळेवर उमेश पाटलांची तिखट पोस्ट!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केतकीने ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. ही वादग्रस्त पोस्ट टाकल्याने तिच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात आता टीकेची झोड उडाली आहे.

दरम्यान सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील  यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केतकी चितळेवर निशाणा साधला आहे.

 त्यांनी म्हटलं आहे की, चंपा म्हणे अश्या माकडा I फेकून माराव्या जोडा II नियतीला तू डर I कमी कर टरटर II ‘नको करू एवढे पाप I शेवटी पवार साहेबचं तुझा बापII चितळेंची चाले फक्त बाकरवडी I केतकी तर चार आण्याची पुडी I’ अशी टीका केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here