बारामतीच्या विश्वचैतन्य आयुर्वेदिक कंपनीला स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची भेटपंढरपूर- गोपाळपूर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा म्हणून बारामतीच्या विश्वचैतन्य आयुर्वेदिक कंपनीला नुकतीच भेट देण्यात आली. यावेळी तेथील कारखान्यात औषधे कशी निर्माण होतात, विविध रसायने, त्यांची मिश्रणे आदी बाबींची प्रमाणे कशी असावीत ? आदी माहिती स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.         बारामतीच्या विश्वचैतन्य आयुर्वेदिक कंपनीतील डॉ.श्रीमंत खाडे, श्रीकांत सोनवणे, सुहास भूवंडी व सारंग बापट यांनी स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांचे स्वागत केले. शिक्षणासोबतच औद्योगिक क्षेत्राचीही ओळख होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. या द्वारे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील विविध तांत्रिक बाबी तसेच औषध निर्माण शास्त्र क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधीची माहिती मिळाली. ही भेट विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, जागरूकता आणि मनोरंजन अशा वेगळ्या स्वरूपाचा अनुभव देणारा एक उत्तम उपक्रम ठरला. स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना कंपनीचे प्रत्यक्षपणे कामकाज पाहण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी कंपनीमधील वेअर हाऊस, गुणवत्ता परीक्षण विभाग, प्रोडक्शन विभाग अशा औषध निर्माण संबंधी विविध विभागातील प्रत्यक्ष कामकाजासंबंधी सविस्तर माहिती घेतली. तेथील अधिकाऱ्यांनी औषधे बनविण्यासाठी लागणारी विविध अत्याधुनिक यंत्रे, उपकरणे याबाबत माहिती दिली. थेट फार्मसी कंपनीला भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कामकाजातील अभ्यासातून शिक्षण मिळत असताना आलेला अनुभव आणि तेथील औषधनिर्मिती कसे करतात याचीही माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौऱ्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होणार आहे. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली प्रा.प्रदीप जाधव, प्रा. सिद्दिका इनामदार, प्रा. ऋतुजा महामुनी, प्रा.दिव्या झाडबुके, धनाजी पोरे, यांच्यासह फार्मसीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here