आमिषाला बळी न पडता आपली फसवणूक टाळा!(सायबर सेल चे शौकतअली सय्यद यांचे आवाहन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

समोरच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणारी मंडळी ऑनलाईन संपर्काला भुलून खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपली फसवणूक करून घेत आहे.ऑनलाईन चॅटिंग , अथवा बोलण्यावर किंवा एखाद्या खोट्या आमिषाला बळी न पडता आपली फसवणूक टाळा असे मत सायबर सेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकतअली सय्यद यांनी व्यक्त केले.

सायबर सेलच्या वतीने पत्रकारांसाठी सोलापुर श्रमिक पत्रकार संघात सायबर विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.

सध्या ऑनलाईन पद्धतीने मोठे फ्रॉड होत आहेत.विविध बोगस कंपन्या स्थापन करून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीस भाग पाडून फसवणूक केली जातेय. याच शिवाय केवाय सी , ऑनलाईन कर्ज प्रकरणे मंजूर करतो म्हणून किंवा बँकेतून बोलतोय.तुमचे एटीएम बंद होणार आहे.लॉटरी लागली आहे.गुंतवणुक केल्यास 2 पट परतावा.शेअर खरेदी विक्री.आशा माध्यमातून फसवुक केल्याच्या घटना घडत आहेत.ऑनलाईन मैत्री करून देखील महिलांची आणि पुरुषांची फसवणूक होत आहे.आशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे तसेच कोणत्याच आमिषाला बळी पडू नये असे आवाहन सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकतअली सय्यद यांनी केले.

यावेळी फेसबुक , युट्युब तसेच इन्स्टाग्राम , ट्विटर , लिंकडीन हाताळणाऱ्या तरुणांनी किंवा व्यवसायिकांनी माहिती अपलोड करताना त्याची खातरजमा करून ती अपलोड करावी.नाहक माहिती अपलोड केलेने एखादी समाज घातक वातावरण तयार होऊ शकते.ज्याचा परिणाम तुम्हाला 2 ते 6 लाखा पर्यंत दंड तसेच 3 ते 6 वर्ष शिक्षा होऊ शकते.त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना विचारपूर्वक सामाजिक भान ठेवून त्याचा वापर करावा असे आवाहन सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश नळेगावकर यांनी केले.

यावेळी सायबर सेलचे महिला अंमलदार पूजा कोळेकर , पोलीस शिपाई वसीम शेख आणि अमोल कारंडे यांनी देखील उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्रमिक पत्रकार संघाचे अधक्ष्य विक्रम खेळबुडे यांनी केले तर प्रास्ताविक समाधान वाघमोडे यांनी केले तर आभार विजयकुमार बाबर यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here