फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये बालसंस्कार वर्गाचा समारोप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या दहा दिवसीय समर कॅम्पचा (बालसंस्कार वर्ग ) आनंदी वातावरणात समारोप पार पडला.

या दहा दिवसात मुलांनी समर कॅम्पला भरभरून प्रतिसाद दिला. काही तरी नवीन शिकण्याचा आणि उत्साहाचा अनुभव त्यांना मिळाला. प्रत्येक दिवसाच्या उपक्रमाची सुरुवात पसायदान व श्लोक याने होत होती. त्याद्वारे मुलांना अध्यात्मिक ज्ञान दिले गेले. शारीरिक व्यायामाचे महत्त्वही तेवढेच आहे. अनेक प्रकारचे योगासने व सूर्यनमस्कार मुलांना शिकवण्यात आले. दुसऱ्या सेशनमध्ये मुलांना डान्स शिकवण्यात आला. त्यामुळे अतिउत्साहात मुलाने डान्स शिकण्याचा मनमुराद आनंद घेतला. तिसऱ्या सेशनमध्ये मुलांनी काहीतरी नवीन शिकावे यासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये रांगोळी, कागदी फुले,विज्ञान उपक्रम, शिवणकला, आग विरहित पदार्थ बनविणे, मोकळ्या वातावरणातील बाहेरील खेळ, स्व- व्यक्तिमत्व विकास असे बरेच उपक्रम घेतले व त्यामध्ये मुलांनी आनंदाने व आवडीने सहभाग घेतला.

या बालसंस्कार वर्गात अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलांचा सहभाग होता. प्रत्येक उपक्रमाचा मुलांनी छान आनंद लुटला .जो उपक्रम घेतला जात होता, तोच उपक्रम मुले घरी गेल्यानंतर ही पालकांना अगदी आनंदाने करून दाखवत होते. त्यामुळे पालकांनाही आनंद झाला, मुले नेहमीच्या दिनक्रमातून काहीतरी वेगळे शिकत आहे याचा त्यांना आनंद होता.या बालसंस्कार वर्गातून मुलांचा शारीरिक ,मानसिक, बौद्धिक विकासावरती भर देण्यात आला. या बालसंस्कारासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या दहा दिवसीय “बाल संस्कार” वर्गाचे आयोजन संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर ,कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.या समर कॅम्पसाठी शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, पर्यवेक्षिका सौ.वनिता बाबर कॉर्डिनेटर श्री. सतीश देवमारे व सौ. शितल बिडवे यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचा समारोप करताना मुलांनी व शाळेतील शिक्षिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नूर बागवान यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.धनश्री घाटोळे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here