पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भोगाव कचरा डेपोला भेट तीन दिवसात संपूर्ण आग विझणार असल्याची दिली माहिती

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गेल्या नऊ दिवसापासून भोगाव कचरा डेपोला लागलेली आग अजूनही पूर्णतः विजलेली नाही. याठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या जात नसल्याने अंतर्गत रस्त्यांची सोय केली. येत्या तीन दिवसामध्ये पूर्ण आग विझेल, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

    आज पालकमंत्री श्री.भरणे यांनी डेपोला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, मनपा गटनेते आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, संतोष पवार, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहायक आयुक्त विक्रम पाटील, उपजिल्हाधिकारी अभिजित चौधरी, अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे, पर्यावरण विभागाचे स्वप्निल सोनलकर आदी उपस्थित होते.
    भोगाव कचरा डेपो येथील काही कचरा हा खूप जुना आहे, यामुळे आग विझण्यास वेळ लागत आहे. मनपा प्रशासनाने आग लागू नये आणि लागली तर काय करावे, याबाबतच्या उपाययोजना कराव्यात. कोणत्याही गाड्या कचरा डेपोत जाता येतील याविषयी सोय करण्यात येणार आहे. भविष्यात कचरा डेपोला आग लागणार नाही, याची दक्षता म्हणून आग प्रतिबंधक यंत्रणा उभा करण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here