महापुरुषांचे विचार रुजवून अंजली मोहूर्ले,महाराष्ट्र व कार्तिक पेटकुले, तेलंगाणा या उच्चशिक्षितांच्या सत्यशोधक विवाहाने दोन राज्यात सलोखा- मंत्री छगन भुजबळ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फुले एज्युकेशन तर्फे 34 वा सत्यशोधक विवाह यशस्वीरीत्या सम्पन्न लवकरच 50 पूर्ण करणार

पुणे-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे 34 वा सत्यशोधक विवाह सोहळा , 134 व्या महात्मा पदवीदिनानिमित्त तेलंगाण राज्यातील 3 रा , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय माळी महासंघ ,तेलंगाणा राज्याचे अध्यक्ष प्रा.सुकुमार पेटकुले यांचे सत्यशोधक कार्तिक पेटकुले (BE. Comp. MBA) आणि चंद्रपूर,मूल, महाराष्ट्राचे जेष्ठ समाजसेवक भैय्याजी मोहूर्ले यांची सत्यशोधिका अंजली मोहूर्ले (BE. Elect.) या उच्चशिक्षितांनी भारताचे राष्ट्रीय ग्रंथ सविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय हातात धरून फुलांच्या पाकळयावरून पायघड्या घालत स्टेजवर आगमन करीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सर्व महामानवाला वंदन करून जनसामान्यांच्या आशीर्वादाने शनिवार दि.7 मे 2022 रोजी दु.12.30 वाजता एस. एम. लॉन्स,मुल, चंद्रपूर येथे सम्पन्न झाला.
यावेळी राज्याचे अन्नपुरवठा व नागरी संरक्षण मंत्री व नाशिकचे पालक मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी शुभेच्छा देताना शुभसंदेस पत्रात म्हंटले की अंधश्रद्धा, कर्मकांड,व आर्थिक उधळपट्टी न करीता महापुरुषांचे विचार रुजवून गेली अनेक वर्षांपासून फुले एज्युकेशन मार्फत हे कार्य अखंडपणे चालू आहे.हे कार्य महाराष्ट्रापुरते मर्यादित न रहाता महाराष्ट्राबाहेर घडू लागलेत ही आनंदाची बाब आहे.तसेच त्यांनी कार्तिक व अंजली यांना शुभेच्छा देऊन त्याचा आदर्श व प्रेरणा इतर लोक नक्कीच घेतील अशी आशा व्यक्त केली.यावेळी वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा फुले एज्युकेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक व
अखिल भारतीय माळी महासंघ , राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदासजी महाजन, यवतमाळ चे प्रदेश अध्यक्ष ऍड.राजेंद्र महाडोळे ,सुकुमार पेटकुले यांचे शुभहस्ते देण्यात आले. यावेळी ,नागपूरचे क्षत्रिय कोसे माळी समाजाचे कोषाध्यक्ष कृष्णा महादुरे, पुणेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे,जेष्ठ साहित्यिक कवी मधु बावलकर,,श्री सिद्ध महायोगपीठ संस्थान , पटनापूर, तेलंगाणा चे अध्यक्ष केशवदादा, इंगळे,व गौरवअध्यक्ष वामनदादा इंगळे ,हैदराबाद चे ओबीसी नेते सूर्याजी राव उपस्थित होते.
विधिकर्ते म्हणून फुले एज्युकेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांचे वेशभूषेत सत्याचा अखंड गात कार्य पार पाडले तर सत्यशोधक विवाहाची माहिती व उद्देशिका वाचन प्रा. सुदाम धाडगे यांनी केले आणि स्वरबहार ऑर्केस्ट्रा या टीमने महात्मा फुले रचित मंगळाष्टक व फुले गीते गाऊन लोकांनची शाबासकीची थाप मिळविली म्हणून त्या सर्वांचा ढोक यांनी फुले गीत चरीत्र ,फुले दांपत्य फोटो फ्रेम भेट दिली तर मोहूर्ले आणि पेटकुले परिवाराने सर्व मान्यवरांचे फुले दाम्पत्य फोटो फ्रेम,शाल श्रीफळ ,गुच्छ देऊन सन्मान केला.तसेच सर्व मान्यवरांचे हस्ते सत्यशोधक विवाह मराठी-लेखक. ढोक व तेलगु -लेखक प्रा..पेटकुले यांनी लिहिलेले भाषेतील पुस्तक यावेळी प्रकाशित करून सर्वाना भेट देत तेलंगाणा ,आंध्रप्रदेश व महाराष्ट्र मध्ये मोठया स्वरूपात सत्यशोधक विवाह लण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.
वधु वर याना फुले एज्युकेशन तर्फे मान्यवरांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र , फुले दांपत्य १ पुटी पुतळा भेट दिला . आई वडील ,मामा मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे गौरवपूर्वक शाल, सन्मानपत्र, व इतरांचे ही देण्यात आले.यावेळी अक्षता फुलांचा वापर केला .यावेळी मोलाचे सहकार्य आकाश मोहूर्ले,संतोष खांडेभराड ,विजय वढाई यांनी केले तर यावेळी दोन्ही राज्यातील हजारो लोक या सोहळ्याचे साक्षीदार झाल्याने मोहूर्ले पेटकुले परिवाराचे कौतुक करीत होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here