विधवांचे कुंकू पुसणे,बांगड्या फोडणे,मंगळसूत्र जोडवी काढण्याच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध कायदा करावा! -प्रा.संग्राम चव्हाण जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी पत्नीचे कुंकू पुसणे मंगळसूत्र व जोडवी काढणे,बांगड्या फोडणे ही अमानुष प्रथा बंद करणे बाबत ठराव करून सामाजिक दृष्ट्या एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे.हे पाऊल अतिशय कौतुकास्पद व एका निरोगी समाज रचनेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून एकविसाव्या शतकाच्या विज्ञान युगात पती गमावलेल्या व प्रचंड दुःखात असणाऱ्या महिलेला दिली जाणारी अशा प्रकारची वागणूक ही मनोवेदना देणारी आणि अपमानास्पद तसेच माणुसकीला काळीमा फासणारी असून हि अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी व समाजाने मानवता- वादी व पुरोगामी विचारसरणीची कास धरून पुढील वाटचाल करावी व सर्वस्व हरपलेल्या विधवा महिलांच्या जीवनामध्ये आशा आणि आनंदाचा किरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र तसेच केंद्र सरकार यांनी कडक कायदा पारित करणे गरजेचे आहे असे मत सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी व्यक्त केले.आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते पुढे म्हणाले, “आजही आपल्या देशामध्ये गावोगावी ही अनिष्ट प्रथा प्रचलित असून जोडीदार गमावलेल्या विधवा महिलेसाठी, तिच्या कुटुंबीयांसाठी तसेच एकूणच ऊपस्थित सर्वांसाठी मनोवेदना देणारी असून स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला छेद देणारी असल्या मुळे तसेच विधवा महिलेचे ऊर्वरित जीवन दुःखी करणारी हीअनिष्ट प्रथा रद्द होण्यासाठी कायदा पारित होणे अतिशय गरजेचे आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी अशा आशयाचा ठराव संमत करून शासनाकडे त्वरित पाठवावा असे आवाहन सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी यावेळी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here