उमेशजी परिचारक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी महादेव बागल व्हा.चेअरमनपदी पांडुरंग व्यवहारे यांची निवड; पहिल्याच वर्षी 50 लाखांचे कर्ज वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गादेगाव येथील उमेशजी परिचारक विकास सेवा सहकारी सोसायटी गादेगावची निवडणूक नुकतीच बिनविरोध होवून चेअरमन पदी महादेव पंढरीनाथ बागल तर व्हा.चेअरमनपदी पांडुरंग जालिंदर व्यवहारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गादेगाव येथील उमेशजी परिचारक विकास सेवा  सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरूध्द पार पडली. या निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी सांगोलकर व सहाय्यक निवडणूक निर्णयक अधिकारी शंकर कवडे यांच्या अधिकाराखाली चेअरमनपदाची निवडणूक घेण्यात आली. चेअरमपदासाठी महादेव पंढरीनाथ बागल व व्हा. चेअरमन पदासाठी पांडुरंग जालिंद व्यवहारे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णयक अधिकारी सांगोलकर यांनी चेअरमपदी महादेव पंढरीनाथ बागल व व्हा.चेअरमनपदी पांडुरंग जालिंदर व्यवहारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.
उमेशजी परिचारक विकास सेवा सहकारी सोसायटीची निर्मिती उद्योगपती उध्दव (बापू) बागल यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव पंढरीनाथ बागल यांनी शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची स्थापना केली. पहिल्याच वर्षी 50 लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक उध्दवबापू बागल यांनी सर्व संचालकांचे अभिनंदन केले. या पुढील काळातही कोणत्याही शेतकरी सभासदांची आडचण होवू नये म्हणून त्यांना तातडीने कर्ज देण्यात यावे असेही उध्दव बागल यांनी सांगितले. निवडी नंतर दै.पंढरी भूषणचे संपादक शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते नुतन चेअरमन महादेव पंढरीनाथ बागल व नुतन व्हा.चेअरमन पांडुरंग जालिंदर व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी नवनिर्वाचीत संचालकांचे सत्कार यावेळी उध्दवबापू बागल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दत्ता (डी.बिल्डर), गादेगावचे उपसरपंच गणपत मोरे, आण्णासाहेब नागटीळक, जालिंदर व्यवहारे, अंकुश शिरसागर, शांतीनाथ बागल, विजय जाधव, आनंद पाटील, नितीन आसबे, संभाजील बागल, महादेव चौगुले, बालाजी (शेठ) बागल, विक्रमआबा बागल, तसेच नुतन संचालक उध्दव पंढरीनाथ बागल, विकास आविनाश बागल, गणेश महादेव बागल, धनाजी विठ्ठल बागल, विजय उदध्व बागल,नागेश  अर्जुन बागल, दत्तात्रय लक्ष्मण हुंडेकरी, अर्जुन रामचंद्र धोत्रे, शांताबाई उध्दव बागल, कांचन नवनाथ बागल आदी उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here