9 वारकरी संघटनांनी एकत्र येऊन घेतला ठोस निर्णय केले पायदळ दिडी सोहळ्याचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

9 वारकरी संघटनांनी एकत्र येऊन घेतला ठोस निर्णय केले पायदळ दिडी सोहळ्याचे आयोजन

महाक्षेत्र आळंदि ते महाक्षेत्र पंढरपुर पायी वारी दिडी सोहळ्याचे आयोजन

सोलापूर // प्रतिनिधी

माझी वारी माझी जबाबदारी
माझी वारी माझी जबाबदारी या संकल्पनेतून काही वारकरी संघटना एकत्र आल्या व सरकारला ज्ञानोबा तुकोबा चा पालखी सोहळा पायी जावा असा आग्रह केला पायी वारी करत आग्रही वारकरी संघटनांच्या कडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे व सरकार पायी वारी विषयी गंभीर नसल्या मुळे नऊ वारकरी संघटना एकत्र येऊन महा क्षेत्र आळंदी ते महा क्षेत्र पंढरपूर 100 भाविकांच्या उपस्थितीत केले दिंडी सोहळ्याचे आयोजन

इतरही वारकरी संघटना पायी दिंडीचे नियोजन करतील ही शक्यता नाकारता येत नाही

दिंडी चे प्रस्थान आळंदी क्षेत्रामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ३-७-२०२१ ला इंद्रायणी तीरावरून अगदी साध्या पद्धतीने दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होईल

कोरोना संकटाचे नाव समोर करुन महाराष्ट्र सरकारने पायी वारी ला परवानगी न दिल्यामुळे आम्ही आमच्या संघटनांच्या वतीने फक्त शंभर वारकऱ्यांच्या उपस्थितीत माझी वारी माझी जबाबदारी या नियमाने पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे
दिंडी सोहळ्या साठी नियम व अटी पुढील प्रमाणे राहतील (१) दिंडी सोहळ्यामध्ये पत्रिकेमध्ये दिलेल्या वारकरी संघटनेमधील पदाधिकारी सहभागी राहतील कारण की हा निर्णय वारकरी संघटनांचा आहे(२) वारकऱ्यांच्या जवळ कोरोना निगेटिव रिपोर्ट असावा व वयोमर्यादा 60 च्या आत असावी, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स व कोरोना संबंधित सर्व नियम पाळावे लागतील(३) तुम्ही दिंडीमध्ये येत असताना तुम्हाला आपल्या वारकरी संघटनेच्या वतीने कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही
तुम्ही तुमच्या स्वतहाच्या मर्जीने व तुमच्या जबाबदारीवर अर्थात माझी वारी माझी जबाबदारी या नियमाने सहभागी होणार आहात(४) आपल्या सोबत कुठल्याही संतांच्या पादुका राहणार नाहीत पण अधिष्ठान म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी व पंचमवेद गाथा या पवित्र ग्रंथांच्या साक्षीने दिंडी सोहळा तील सर्व नियमावली पार पडेल (५) दिंडी मध्ये स्वताहाचा टाळ सोबत आणावा टाळ नसल्यास पताक घ्यावी लागेल (६) हे सर्व नियोजन वेळेवर चे आहे तरीपण आपला सांभाळ आपली माऊली करेल(७) पायी वारीचा आग्रह वारकऱ्यांचा आहे पण सरकारचा या गोष्टीला विरोध आहे म्हणून सरकार आपल्यावर पोलीस बळाचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतील(८) मानाच्या पालख्या वाखरी येथे पोहोचणार त्या वेळेला आपण वाखरी येथे पोहचु अशा पद्धतीने आपली चालगती राहील(९) आपण वाखरी येथे पोहोचल्यानंतर होऊ शकते कदाचित बसणे येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश मिळेल आणि आपण एवढ्या दूरुन पायदळ आल्यानंतर पंढरपुरात पोलीस जाऊ देणार नाहीत (१०)वाखरी येथे जर पोलिसांनी अडवलं तर पोर्णिमे पर्यंत तिथेच भजन सत्याग्रह आंदोलन करण्याचा आमचा निर्धार आहे(११)पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शनाची रीतसर पास नसल्यामुळे आपण कळसाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त करू शकतो(१२)मुक्कामाच्या ठिकाणांमध्ये वेळेनुसार बदल होऊ शकतो म्हणून तारखेनुसार मुक्काम टाकलेले नाहीत(१३) पायी दिंडी सोहळ्या मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या जवळून कुठल्याही प्रकारची आर्थिक निधी स्वीकारल्या जाणार नाही (१४) आम्ही कुठेही चहा ,नाश्ता भोजनाची व्यवस्था लावलेली नाही पण सामाजिक संघटना दिंडीतील वारकऱ्यांची चहा ,नाश्ता ,भोजनाची, निवासाची व्यवस्था करतील कारण की आमचा पांडुरंग आम्हाला उपवाशी झोपू देणार नाही असा आम्हाला विश्वास आहे(१५) हे नियोजन ठराविक वारकरी संघटनांनी केले असून इतरही वारकरी संघटना त्यांच्या इच्छेनुसार नियोजन करू शकतात(१६) वारकऱ्यांचे मुक्काम हे गावाच्या बाहेर शाळेमध्ये करण्याचे प्रयत्न करू
दिंडीतील वारकर्‍यांनी गावातील कुठल्याही वारकऱ्यांच्या संपर्कात येऊ नये(१७) आम्ही सरकारला वारकऱ्यांच्या सोबत चर्चा करण्या करता 24 जून पर्यंत चा अवधी दिलेला आहे जर त्याआधी वारकऱ्यांच्या सोबत चर्चा झाली आणि पन्नास वारकऱ्यांच्या उपस्थित ज्ञानोबा तुकोबा च्या पालखी सोहळ्याला पायी वारीची परवानगी मिळाली तर संबंधित मंदिर समिती जे वारकरी ठरवतील त्यांच्या इच्छेनुसार पायी वारी सोहळ्यात वारकरी जातील
मग तिथे आम्ही म्हणू त्याच वारकऱ्यांना पाठवा असा मुळीच आग्रह राहणार नाही आम्ही हस्तक्षेप सुद्धा करणार नाही(१८) संपूर्ण वारी ही बायोबबल पद्धतीने पार पडणार आहे बायोबबल पद्धत कशाला म्हणतात हे दिंडी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना समजून सांगितले जाईल(१९)आम्ही आमच्या जबाबदारीने आणि नियमाचे पालन करुन जात असल्यामुळे आम्हाला पोलीस प्रोटेक्शन ची मुळीच आवश्यकता नाही फक्त पोलीस प्रशासनाने दिंडीतील वारकऱ्यांना त्रास देऊ नये व कोठे अडवण्याचा प्रयत्न करू नये ही नम्र विनंती(२०) दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यांमध्ये
किमान दोन फूट अंतर राहील
(२१)आपल्या सोबत पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था राहणार पण स्वतःची जबाबदारी म्हणून पाणी बॉटल सोबत ठेवावी(२२) दिंडी सोहळयाला ला वैद्यकीय पथक भेट देण्याकरता येणारच पण तरीसुद्धा सर्दी ,ताप, खोकला व आपल्या नेहमीच्या औषध गोळ्या सोबत असाव्या(२३) दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी किर्तन जागराचे नियोजन वेळ प्रसंगानुसार होईल(२४) आम्हाला वारी संदर्भात मुळीच राजकारण करायचं नाही आणि आतापर्यंत समोर दिलेल्या वारकरी संघटनांनी कुठल्याही विरोधी पक्षाला निवेदन दिले नाही किंवा पाठिंबा मागितला नाही
पण पायदळ दिंडी सुरू झाल्यानंतर सरकारने पोलीस बळाचा वापर करून दिंडीमध्ये वारकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रातील सर्व वारकरी व सर्व विरोधी राजकीय पक्षांना आम्ही सहकार्य मागणार(२५) माऊलीच्या पालखी सोहळ्यातील मालक शितोळे सरकार ,वासकर महाराज ,चोपदार यांनी सोबत राहावे ही संबंधित वारकरी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे(२६) आमच्याजवळ ज्यांची अधिकृत नोंदणी राहील त्यांना माझी वारी माझी जबाबदारी नावाने ओळख पत्र देण्यात येईल
हे नियोजन फक्त शंभर वारकऱ्यांच्या उपस्थित राहील वेळेवर कोणीही सहभागी होऊन आम्ही तयार केलेली नियमावली मोडू नये ही नम्र विनंती
पायी दिंडीचे आयोजन समोरील वारकरी संघटना एकत्र करन्यात आले आहे
विश्व वारकरी सेना ह भ प श्री अरुण महाराज बुरघाटे,ह-भ-प श्री गणेश महाराज शेटे ,अखिल वारकरी भाविक मंडळ ह-भ-प श्री सुधाकर महाराज इंगळे ,राष्ट्रीय भागवत धर्म परिषद ह-भ-प श्री चिंतामणी महाराज परभणीकर ,ह-भ-प श्री योगेश महाराज सातारकर ,पायी दिंडी पालखी सोहळा इतिहास परंपरा संशोधक नांदेड ह-भ-प श्री सदाशिव महाराज पवळे ,वारकरी सेवा फाउंडेशन ह भ प श्री पांडुरंग महाराज शितोळे ,अखिल विश्व वारकरी परिषद ह भ प श्री नितीन महाराज सातपुते वारकरी युवक संघ
ह भ प श्री संतोष महाराज काळे ,हिंदू रक्षक धर्म परिषद ह-भ-प श्री दत्ता महाराज गांगरे ,ह भ प श्री महादेव पाटील गायकवाड ह-भ-प श्री योगेश महाराज शिंदे राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद
व इतरही वारकरी संघटनांनी पुढाकार घेऊन पायी वारी झाली पाहिजे या नियमाने आम्हाला पाठिंबा दर्शवून आमचे बळ वाढवण्याच प्रयत्न करतील किंवा इतर काही वारकरी संघटना आपल्या इच्छेप्रमाणे पायी वारी सोहळा चे नियोजन करतील ही शक्यता नाकारता येणार नाही

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here