फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक, नाटककार कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो. शाळेचे प्राचार्य सिकंदर पाटील व शिक्षिका वनिता बाबर यांनी  वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून  कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.     

यावेळी प्रशालेच्या ‌शिक्षिका सौ.शितल बिडवे यांनी विद्यार्थ्यांकडून   प्रतिज्ञा  व भारतीय  संविधान मराठीतून म्हणून घेतले. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्याबद्दलची  माहिती व त्यांच्या काव्याचे वाचन केले. इयत्ता पहिलीतील  विद्यार्थिनी ईश्वरी गायकवाड हिने कुसुमाग्रज व मराठीभाषे बद्दलची  माहिती दिली. तर इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी श्रुती कदम हिने मराठी भाषेची थोरवी सांगितली. इयत्ता सहावीतील शौर्य लिगाडे याने कुसुमाग्रज यांची सुप्रसिद्ध कविता कणा ही सादर केली. इयत्ता सातवीमधील मिताली यमगर‌ हिने मराठी मातीचा लावा टिळा ही कविता सादर केली. प्राचार्य सिकंदर पाटील यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, संस्थेचे  कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  व प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का केदार हिने केले. यावेळी सर्व शिक्षकवृंद व शिक्षेकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here