पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित बी.फार्मसी तथा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत १२ वा ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला.
प्रास्ताविकात स्वेरी फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहल चाकोरकर यांनी ‘राष्ट्रीय मतदार दिना’ची सविस्तर माहिती देवून मतदानाचे महत्व पटवून देताना म्हणाल्या कि, ‘भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. १८ वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे तरीसुद्धा देशातील मतदानाचा टक्का कमी आहे. यासाठी १८ वर्षावरील प्रत्येकानी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. म्हणजेच आपल्या देशाची लोकशाही अधिक मजबूत राहण्यासाठी आणि देशातील मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.’ ‘राष्ट्रीय मतदार दिना’ निमित्त स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच १८ वर्षावरील विद्यार्थी यांनी ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय कर्तव्याची सामुहिक शपथ घेतली. यावेळी सुमारे १५८ विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय मतदार दिनाच्या दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आदित्य उबाळे यांनी प्रथम क्रमांक, ऋतुजा मिसाळ यांनी द्वितीय तर वृषाली व्यवहारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. फार्मसी मधील प्रणोती चव्हाण, मयांक शेळके, कोमल मोरे, सुप्रिया खेडकर या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला तसेच प्रगती मुढे, साक्षी आसबे, प्रियांका वाघमारे, पूजा बत्तुल यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी विठ्ठलदास यांनी केले तर चैत्राली रिसवडे यांनी आभार मानले.