नगरपंचायतीच्या सदस्य पदांचा सार्वत्रिक निवडणुका 2021-22 चा कार्यक्रम जाहीर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोमवार दि 20(जिमाका): मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार ना.मा.प्र.करिता आरक्षित असलेल्या जागा अनाक्षित करण्यात आलेल्या असून अशा एकूण 106 नगरपंचायतीच्या सोबतच्या परिशिष्ट-3 मधील नमूद सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुका-2021-22, कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्‍य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, म्हाळुंग-श्रीपूर,वैराग व नातेपुते या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रम

1.जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख-28 डिसेंबर 2021 मंगळवार

2.नामनिर्देशनपत्र राज्य निवडणुक आयोगाने निश्र्चित केलेल्या वेबसाइटवर भरण्याकरीता उपलब्ध करण्याचा कालावधी-29‍ डिसेंबर 2021 बुधवार सकाळी 11 ते 3 जानेवारी सोमवार दुपारी 2.00 पर्यंत

3.वरील नामनिर्देशनपत्रे स्विकरण्याचा कालावधी-29 डिसेंबर 2021 बुधवार ते 3 जानेवारी 2022 सोमवार सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत, दिनांक 1 जानेवारी 2022 शनिवार व दिनांक 2 जानेवारी 2022 रविवार या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.

4.नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करयाचा दिनांक – 4 जानेवारी 2022 मंगळवार सकाळी 11.00 वाजल्यापासुन

5.नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम दिनांक अपील नसेल तेथे-10 जानेवारी 2022 सोमवार दुपारी 03.00 वाजेपर्यंत

5-अ- अपील असल्यास-1) वैधरित्य नामनिर्देशित केलेल्या उमेदवारींची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत,जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल.2)निवडणुक निर्णय अधिकारी यानी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत-अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी

6.निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक-उमेदवारी मागे घेण्यासाठीच्य शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी

7.आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक-18 जानेवारी 2022 मंगळवार सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत

8.मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक-19 जानेवारी 2022 बुधवार सकाळी 10.00 वाजल्यापासून

9.महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे-कलम 19 मधील तरतुदीनुसार

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here