6 लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ-आ.बबनराव शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

6 लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ-आ.बबनराव शिंदे

युनिट नं.2 करकंब चा हंगाम 2021-22 चा 3 रा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न-

 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.युनिट नं.2-करकंब या कारखान्याचा गाळप हंगाम 2021-22 चा 3 रा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ गुरूवार दि.09/09/2021 रोजी दुपारी 12.25 वाजता कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सिंधूताई चव्हाण यांचे शुभहस्ते व संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

 

कार्यक्रमाची सुरूवात कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. बॉयलर प्रदीपन समारंभा-निमित्त सत्यनारायण महापुजा कारखान्याचे संचालक सचिन देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनालीताई देशमुख रा.आलेगांव यांच्या शुभहस्ते पार पडली.

 

विठ्ठलराव शिंदे कारखान्याने ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये 6लाख मे.टन गाळप करणेचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे 8 हजार हेक्टर क्षेत्राची नोंद आहे. कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा आवश्यक यंत्रणेचे नियोजन करणेत आलेले आहे. ऑफ सिझन मधील सर्व कामे पूर्ण झालेली असून गाळप हंगाम शासनाचे धोरणानुसार सुरू करणेस यंत्रणा सज्ज झालेली आहे. या हंगामात कारखान्याचे 12.5 मे.वॅट सहविजनिर्मिती प्रकल्पातून 3.50 कोटी युनिट निर्यात होणे अपेक्षीत आहे.

 

सदर प्रसंगी संचालक पोपट चव्हाण, शिवाजी डोके, रमेश येवलेपाटील, प्रभाकर कुटे, लक्ष्मण खुपसे,सुरेश बागल,वेताळ जाधव,लाला मोरेसचिन देशमुख, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे,युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव, चिफ इंजिनिअर एस.एस.महामुनी, चिफ केमिस्ट बी.जे.साळुंखे, शेतकी अधिकारी बी.डी.इंगवले,वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे,जनरल मॅनेजर(प्रोसेस)पी.एस. येलपले, केन मॅनेजर एस.पी.थिटे, जनरल मॅनेजर (एच.आर.) पी.ए.थोरात, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here