52 डब्यांची भीमा कारखाना सुपर एक्स्प्रेस गाडी आता सुसाट!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(रू 2100 प्रमाणे प्रथम उचल बॅंक खात्यावर जमा -प्रा.संग्राम चव्हाण)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

नकारात्मक दृष्टिकोन आपणास ध्येय अथवा प्रगतीकडे नेऊ शकत नाही.मात्र संस्थेवरील प्रेम,संयम,सारासार विचार,आशावाद व सकारात्मक दृष्टिकोण मात्र कुठल्याही संकटावर मात करण्याचं सामर्थ्य देतो.देशातील 550 साखर कारखान्यांपुढे विविध संकटांमुळे आव्हान निर्माण झाले असतानाही ‘बोळात गाठून’ भीमा बचाव समितीने सत्ता हव्यासा पोटी एकामागून एक असे अनेक धादांत खोटे व चुकीचे आरोप तसेच शासन दरबारी खोट्या तक्रारी करून व बॅंकांनी अर्थसहाय्य करु नये व ऊसबीले देता येऊ नये तसेच सभासदांनी ऊस भीमाला घालू नये परिणामी कारखानाच बंद पडून विद्यमान संचालक मंडळ बदनाम व्हावे ह्या घाणेरड्या कुटिलनितीचा वापर करत सभासदांच्या हिताचा सपशेल बळी देत विषारी अफवा पसरवून भीमाच्या सभासदांचीच नव्हे तर सरकारचीही दिशाभूल केल्यामुळे कारखान्याच्या अडचणींमध्ये वाढच होऊन त्याचा सभासदांना थेट त्रास झाला.

मात्र “बी पॉझिटीव्ह आणि भीमा बढाओ” ही टॅगलाईन घेऊन चेअरमन श्री.धनंजय महाडिक हे सभासद व कामगारांच्या थकीत देयकाची पै पै चुकती करतील असा विश्वास आम्ही वेळोवेळी सभासदांना व कामगारांना दिला व सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहत चेअरमन खा.धनंजय महाडिक यांनीही दिलेला शब्द खरा करून दाखवल्यामुळे भीमा परिवाराचे नेतृत्व व कारखान्याचे चेअरमन खासदार श्री.धनंजय महाडिक यांच्यावरील विश्वास आता द्विगुणीत झाला आहे. या कटू व घाणेरड्या अनुभवातून त्यांचे नेतृत्व आता तावून सुलाखून निघाले आहे.आज भीमा कारखान्या पुढील सर्व अडचणी संपल्या असून भीमा कारखान्याची गाडी पुन्हा रुळावर आली आहे हि अत्यंत समाधानाची बाब असून चालू हंगामात प्रतिदिन सुमारे 4500 हजार टन उसाचे गाळप सुरू झाले आहे.

1ल्या पंधरवड्यात चे रू 2100 प्रमाणे ऊसबिलापोटी प्रथम उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. 8 लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना प्रशासन व तोडणी यंत्रणा सज्ज आहे. वजनकाट्याच्या पारदर्शकतेमुळे “आपला ऊस आपल्या भीमालाच ” घालवण्याचा सभासदांचा निर्धार पक्का झाला आहे. त्यामुळे कारखाना जॅमींग मध्ये चालत आहे. 52 गावांची सर्वपक्षीय अशी 52 डब्यांची भीमा कारखाना सुपर एक्सप्रेस गाडी आता सुसाट सुटली असून तिला कुठल्याही अप-प्रवृत्तींनी रोखायचा प्रयत्न केला तर धुरळा ऊडवून टाकू” असे प्रतिपादन ज्यांनी
भीमा परिवारावर आणीबाणीचा व बाका प्रसंग ओढविल्यावर अडचणीच्या काळात भीमा परिवाराच्या नेतृत्वाच्या वतीने सभासद कामगारांचा विश्वास व आपुलकी जिंकून भीमा कारखान्याची योग्य व अभ्यासपूर्ण
बाजु समर्थपणे व तेवढ्याच आक्रमक पणाणे मांडून विरोधकांचे आक्रमण रोखून ज्यांनी भीमा कारखान्याची “बाजीप्रभू” प्रमाणे यशस्वीपणे
” खिंड लढवली “असे भीमा परिवाराचे समन्वयक तथा टाकळी सिकंदरचे अभ्यासू युवानेता प्रा.संग्रामदादा चव्हाण यांनी केले. याप्रसंगी भीमा परिवाराचे बापूसाहेब चव्हाण, हिम्मतराव पाटील, सिद्धूबापू अनुसे,पत्रकार सुनील चव्हाण, भीमराव वसेकर,संतोषदादा चव्हाण,विकील दादा चव्हाण, पोपटराव सोनटक्के,पोपटअण्णा चव्हाण,संतोष बचुटे, भाऊराव वसेकर, रामभाऊ हराळे,बंडू अनुसे,पोपट वसेकर, समाधान वसेकर,माऊली वसेकर,अक्षय गायकवाड,विश्वास गायकवाड,दिपक वाघमारे,राजू सोनटक्के,संतोष सोनटक्के,लक्ष्मण गुरव रहिमबक्षभाई तांबोळी,जमीर मुजावर रसूल मुजावर ऊपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here