पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच होणार: शरद चंद्रजी पवार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच होणार: शरद चंद्रजी पवार

सोलापूर // प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे निर्माते खासदार शरद पवार हे 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरात येताच त्यांनी कोरोना कालवधीत घेतलेल्या बैठकीची आणि विधानसभा निवडणुकांच्या आठवणी जागवल्या. तसेच, राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना आता घरी बसवायचं आहे, असे म्हणत सोलापूरातून आपण संघर्षाची सुरूवात केली होती, याची आठवणही पवारांनी सांगितली.  

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सोलापूरला आलो होतो. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींना घेऊन सोलापूरमध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज सोलापूरमध्ये येण्याचा योग आला. सोलापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याबद्दल प्रशासन, राज्य सरकार आणि आरोग्य कर्मचारी यांना धन्यवाद द्यायला हवे, असे पवार यांनी म्हटले.

तसेच, आणखी एक गोष्ट सोलापूरच्या निमित्ताने आठवली. विधानसभेच्या निवडणुकीआधी सोलापूर जिल्ह्यात अनेक नेत्यांची पळापळ सुरू होती.अनेक वर्ष पक्षात महत्त्वाची पदं भूषवलेले अनेक नेते पक्ष सोडून पळून गेले. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता होती. त्यावेळी या पळपुट्या नेत्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज होती. तो निर्णय आम्ही घेतला व त्या संघर्षाची सुरुवात याच हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहातून केली. माझे पहिले भाषण येथेच झाले होते. त्यावेळी चर्चा होती की, भाजपचेच सरकार येणार. पण, आज राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आत्मविश्वासाने लढल्याची आठवण पवार यांनी सोलापुरात करून दिली. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here