धनाजी साठे अंत्यसंस्कार प्रकरणी सखोल चौकशी व दोषींवर कडक कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

धनाजी साठे अंत्यसंस्कार प्रकरणी सखोल चौकशी व दोषींवर कडक कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन!

 

सोलापूर // प्रतिनिधी 

माळशिरस तालुक्यातील मयत धनाजी साठे यांच्या अंत्यसंस्कार बाबत या अमानवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शासन करा ही मागणी घेऊन सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांना निवेदन देण्यात आले.तातडीने यावर कृती घडावी अन्यथा समस्त मातंग समाज व बहुजन समाजातील पिडीत कुटुंबाच्या समर्थनार्थ चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावरच्या लढाईचा पवित्रा घेणार असल्याची माहिती जाती अंत संघर्ष समितीचे सूर्यकांत केंदळे यांनी दिली.

यावेळी अनिल वासम म्हणाले की, मा.पोलीस अधीक्षक सातपुते यांनी
सदर प्रकरणी पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्फत चौकशी नेमली असून
दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

सोमवार 20 सप्टेंबर रोजी जाती अंत संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष रंगप्पा मरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली अनिल वासम,बजरंग गायकवाड, सूर्यकांत केंदळे, मल्लेशाम कारमपुरी आदींच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.

यावेळी दीपक निकांबे,तानाजी जाधव,नरेश दुगाणे, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण,मरेप्पा फंदीलोळू, शंकर म्हेत्रे,नितीन गुंजे,राजेश काशीद विश्वजित कदम आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here