3 पोलीस निरीक्षक, 2 सहा.पोलीस निरीक्षक व 5 पीएसआय यांच्या बदल्या

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

3 पोलीस निरीक्षक, 2 सहा.पोलीस निरीक्षक व 5 पीएसआय यांच्या बदल्या

 

राज्याच्या गृह विभागाने राज्यातील कालावधी पूर्ण झालेल्या 294 पोलीस निरीक्षक, 360 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 404 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये सोलापूर शहरातील वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष काणे यांची नवी मुंबईला बदली झाली आहे, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांची पिंपरी चिंचवडला, खाजाउद्दीन पटेल यांची उस्मानाबाद येथे बदली झाली आहे तर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील श्रीकांत बाचके यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

तर सांगलीवरून संजय सुर्वे हे पोलीस प्रशिक्षण केंद्रात येत आहेत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून शरद मेमाने हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात येत असून सोलापूर शहरसाठी राजन माने यांची नियुक्ती झाली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये रोहित दिवसे यांची कोल्हापूर परिक्षेत्र या ठिकाणी बदली झाली आहे तसेच सिद्धनाथ खांडेकर यांची पुणे शहर या ठिकाणी बदली झाली आहे.

पोलीस उपनिरीक्षकांमध्ये देविदास करंडे गडचिरोली, दत्तात्रेय लिगाडे, सचिन बनकर, शैलेश खेडकर कोल्हापूर परिक्षेत्र याठिकाणी व श्वेताली सुतार यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची या ठिकाणी बदली झाली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here