25/15 योजनेअंतर्गत अजनसोंड येथे मुरमीकरण कामाचे रणजितभैय्या शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन! माढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन !

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

25/15 योजनेअंतर्गत अजनसोंड येथे मुरमीकरण कामाचे रणजितभैय्या शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

माढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन !

पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथे २५१५ योजनेअंतर्गत माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय मा.आमदार बबनरावजी (दादा) शिंदे साहेब यांनी मंजूर केलेल्या १० लाख रु.निधीतून खंडोबाची वाट ते कॅनॉल पट्टी रस्त्याच्या मुरमीकरण कामाचे व गावकऱ्यांनी ५ लाख रुपये लोकवर्गणीतून बांधलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयाचे उद्धाटन तसेच २५१५ योजनेतून १० लाख रुपये मंजूर केलेल्या निधीतून श्री तुळजा भवानी मंदिर सभामंडपाचे तसेच विविध विकास कामांचे भुमीपूजन सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितभैय्या शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.

गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेचे शौचालय बांधले ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. त्याचबरोबर शाळेसाठी संरक्षक भिंत व क्रीडांगणासाठी तसेच रस्ते व इतर मंदिराच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आदरणीय बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून निधी दिला जाईल असे रणजीतभैय्या शिंदे यांनी आश्वासन दिले.

प्रसंगी अरुणकाका घाडगे, धोंडीआप्पा डुबल, सुरेश घाडगे, सत्यवान डुबल, जयद्रथ बंगाळे मेजर, दत्ताआप्पा घाडगे मेजर, संजय डुबल, तानाजी शिरगिरे, नागनाथ शिरगिरे, परमेश्वर डुबल, माजी सरपंच दत्ता आप्पा घाडगे, अण्णासाहेब डुबल, भरत घाडगे, राजेंद्र घाडगे, तात्यासाहेब घाडगे, दीपक घाडगे, राजेंद्र कदम, श्रीराम डुबल, सुनील पवार, प्रकाश डुबल, मच्छिंद्र डुबल, मुख्याध्यापक खडतरे सर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here