2021- 22 च्या ऊस गळीत हंगामासाठी १ हजार १८९लाख टन उसाची गाळप आणि दाट शक्यता

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

2021- 22 च्या ऊस गळीत हंगामासाठी १ हजार १८९लाख टन उसाची गाळप आणि दाट शक्यता

 

पुणे // प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयातील आकडेवारीनुसार आगामी गळीत हंगामात सुमारे १ हजार १८९ लाख टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. त्यातून ११२ लाख टन साखर (इथेनॉलचे उत्पादन गृहीत धरून) उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी देशातून ६० लाख टन साखर निर्यात झाल्याने साखरेचे साठे कमी असले तरी यंदा राज्यात विक्रमी उत्पादन होणार आहे.

गेल्या वर्षी थेट उसाच्या रसापासून, बी-हेवी व सी हेवी मोलॅसिसपासून एकूण ५० कोटी ७३ लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा ऑइल कंपन्यांना केला आहे. उर्वरित पुरवठाही केला जात आहे. गतवर्षी इथेनॉल निर्मितीमुळे ७ लाख १० हजार टन साखरेचे उत्पादन कमी झाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here