19 लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ-आ.बबनराव शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

19 लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ-आ.बबनराव शिंदे

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा हंगाम 2021-22 चा 21 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न-

 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.युनिट नं.1-पिंपळनेर या कारखान्याचा गाळप हंगाम 2021-22 चा 21 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ गुरूवार दि.09/09/2021 रोजी सकाळी 10 वाजता कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांचे शुभहस्ते व संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

 

कार्यक्रमाची सुरूवात कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. बॉयलर प्रदीपन समारंभा-निमित्त सत्यनारायण महापुजा कारखान्याचे संचालक संदीप पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी विद्याताई पाटील रा.बुद्रुकवाडी यांच्या शुभहस्ते पार पडली.

विठ्ठलराव शिंदे कारखान्याने ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये 19 लाख मे.टन गाळप करणेचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे 32 हजार 696 हेक्टर क्षेत्राची नोंद आहे. कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा होण्यासाठी आवश्यक यंत्रणेचे नियोजन करणेत आलेले आहे.ऑफ सिझन मधील सर्व कामे पूर्ण झालेली असून गाळप हंगाम शासनाचे धोरणानुसार सुरू करणेस यंत्रणा सज्ज झालेली आहे. अतिरिक्त साखर उत्पादन, साखरेचे दर व कोव्हीड-19 यासह अनेक अडचणींना तोंड देत साखर कारखानदारी मार्गक्रमण करीत आहे. केंद्रशाससाने इथेनॉल उत्पादनास दिलेल्या प्रोत्साहनातंर्गत कारखान्याने सध्याचे डिस्टीलरी प्रकल्पाची क्षमता 60 केएलपीडीवरून 150 केएलपीडी पर्यंत विस्तारवाढ केलेली आहे. कारखान्याने इन्सिनरेशन बॉयलर ची उभारणी केलेली असल्याने वर्षभर डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वीत राहणार असून 4 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करून ऑईल कंपन्यांना पुरवठा करणेचे नियोजन केलेले आहे. ऑईल कंपन्यांना विक्री करण्यात येणा-या इथेनॉलमुळे संस्थेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. या हंगामात कारखान्याचे 38 मे.वॅट सहविजनिर्मिती प्रकल्पातून 9.50 कोटी युनिट निर्यात होणे अपेक्षीत आहे.

 

संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यश्वस्वी घौडदौड चालू असून कारखान्याने अल्पवधीत गाळपक्षमता 11000मे.टन, 38मे.वॅट सहविजनिर्मिती प्रकल्प, डिस्टीलरी प्रकल्प 150 केएलपीडी पर्यंत विस्तारवाढ, प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वीत केले आहेत अशी माहीती व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांनी दिली.

 

सदर प्रसंगी पंचायत समिती सभापती तथा संचालक विक्रमसिंह शिंदे, शिवाजी डोके, रमेश येवलेपाटील, प्रभाकर कुटे, पांडूरंग घाडगे, वेताळ जाधव,लाला मोरे, लक्ष्मण खुपसे,सुरेश बागल, दिपक पाटील कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे,युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव,वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे,जनरल मॅनेजर(प्रोसेस)पी.एस. येलपले, केन मॅनेजर एस.पी.थिटे,जनरल मॅनेजर (एच.आर.) पी.ए.थोरात,डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, मुख्य शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर, सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे ,सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here