पंढरपूर नगरपरिषदेची धक्कादायक बाब उघड शहरातील रस्त्यांना ओळखच नाही :- तालुकाध्यक्ष अमरजित पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्त्यांच्या समस्येवर पंढरपूर शहरातील विविध राजकीय पक्षांची व सामाजिक संघटनांची वेळोवेळी आंदोलने होत असतात.परंतु पंढरपूर शहरातील खराब रस्त्यांचा प्रश्न मुळातून सोडवण्यासाठी हेच राजकिय व सामाजिक कार्यकर्ते कायद्याच्या अपुर्‍या ज्ञानामुळे कमी पडतात.त्यामुळे मुळ प्रश्नांची सोडवणुक न होता खराब रस्त्यांचा प्रश्न आंदोलनापुरता मर्यादित राहात आलेला आहे.

आम्ही या विषयाच्या मुळाशी जात पंढरपूर नगरपरिषदेला दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रस्ता रजिस्टरची मागणी केलेली होती.त्यावर दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पंढरपूर नगरपरिषदेने आम्हाला रस्ता रजिस्टर पाहण्यासाठी उपलब्द करुन दिलेले आहे.
या प्रकरणातील महत्वाची आणि अत्यंत आर्श्चयकारक बाब म्हणजे गेली अनेक वर्ष पंढरपूर नगरपरिषदेने रस्ता रजिस्टर तयारच केलेले नव्हते. आम्ही मागणी केल्यानंतर गेल्या पाच वर्षाचे सदर रजिस्टर तयार करण्यात आले आहे.

परंतु,सदर रजिस्टरमध्ये अद्यापही अनेक त्रुटी असल्याचे आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे नगरपरिषद अधिनियम १९६५ कलम क्रमांक १८५ नुसार नगरपरिषदेने रस्त्यांना नावे व क्रमांक देणे बंधनकारक असताना,पंढरपूर नगरपरिषदेने आज तागायत या कायद्याचे पालनच केलेले नसून पंढरपूर शहरातील रस्त्यांना नावे व नंबरच दिलेले नाहीत.

त्यामुळे पंढरपूर शहरातील रस्त्यांना ओळखच नाही. यासह अन्य त्रुटी आम्ही पंढरपूर नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत व तसे पत्र ही पंढरपूर नगरपरिषदेस सादर करीत आहोत.याकामी पंढरपूर नगरपरिषदेचे कर्मचारी श्री.धुमाळ व पंढरपूर नगरपरिषद,बांधकाम विभाग मुख्य अभियंता श्री.नेताजी पवार यांचे सहकार्य मिळाले.सदर विषयी आम्ही सातत्यपुर्ण पाठपुरावा करत राहून पंढरपूर शहरातील नागरिकांना त्यांच्या वार्डातील,गल्लीतील व शहरातील प्रमुख रस्ते सुस्थितीत ठेवले जातील याची काळजी आम्ही घेत आहोत.

अशी माहिती तालुका अध्यक्ष पंढरपूर काँग्रेस कमिटी.व कर्मवीर

औदुंबरअण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजीत पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here