कारखाना कामगार व ऊसतोड मजुरांच्या आरोग्य तपासणीसाठी आवताडे शुगर येथे आरोग्य शिबिर संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदूर व प्राथमिक आरोग्य केंद्र, मरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर कामगार व ऊसतोड मजुरांचे आरोग्य तपासणी शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये कारखाना कर्मचारी ऊसतोड कामगाराचे एकुणात्मक ३५२ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या कामगार व मजुरांची मंगळवेढा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मंगळवेढा येथील डॉ विलास तोंडे पाटील व डॉ अरुण कुमार यांचे मार्फत इ.सी.जी, रक्तदाब, मधुमेह आधी आरोग्य विषयक समस्यांची तपासणी करून उपचारपर मार्गदर्शन करण्यात आले.पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन तथा नामवंत उद्योगपती संजय आवताडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये कारखाना कामगार व ऊसतोड मजूर यांची शारीरिक आरोग्य तपासणी करून नामवंत डॉक्टरांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवर व शिबिरासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर मंडळी आणि कर्मचारी या सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभा राहून नंदेश्वर येथे घडलेल्या अमानुष तिहेरी हत्याकांडातील माऊलींच्या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हे ही वाचा :पंढरपूर पंचायत समितीकडून 75 सायकलींचे वाटप
हे ही वाचा :स्वेरीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागांतर्गत उद्योजकता विकासपर सत्र संपन्न
यावेळी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी मिस्टर संचालक प्रमोदकुमार म्हमाणे यांनी सांगितले की, ऊसतोड व साखर कारखानदारीमध्ये शारीरिक परिश्रम यांच्याशी सलगी करून रात्रं- दिवस अविरतपणे कष्ट करणाऱ्या कामगारांच्या व ऊसतोड मजुरांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कारखाना प्रशासन नेहमी सजग असते. केवळ व्यावसायिक व व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता कारखाना सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या कामगार व मजुरांच्याप्रती संवेदनशील दृष्टिकोन ठेवून कारखाना प्रशासनाने आयोजित केलेल्या या शिबिराचे सर्वच मंडळींनी कौतुक केले.

या शिबिरासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, श्री संत दामाजी शुगर माजी मिस्टर संचालक भारत निकम डॉ. भिमराव पडवळे, एच आर मॅनेजर डी. बळवंतराव, वर्क्स मॅनेजर दिलीप जाधव, चिफ केमिस्ट मोहन पवार, डिस्टलरीज मॅनेजर संभाजी फाळके, फायनान्स मॅनेंजर रघुनाथ उन्हाळे, शेती अधिकारी रमेश पवार व संपत आटकळे, वसंत लेंडवे, आय टी मॅनेंजर मिनाज शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, सुरक्षाअधिकारी चंद्रकांत राठोड, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गौरीशंकर बुगडे, सिद्धराया बिराजदार, आनंद हत्तरसंघ, आरोग्य सहाय्यक नागनाथ लंगोटे, औषध निर्माण अधिकारी हनुमंत कलादगी, प्रवीण पवार, चंद्रकांत पवार, शहजान मुलाणी, विद्याराणी स्वामी, मोहन सरडे, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका आदी मान्यवर व आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here