पोलीस निरीक्षक तानाजी सावंत पोलीस पदक व प्रमाणपत्र देऊन राजभवन मुंबई येथे सोहळा संपन्न! (राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान संपन्न)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गुणवत्तापूर्ण केलेल्या पोलीस सेवेनिमित्त कोल्हापूर पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना 26 जानेवारी 2021 मध्ये जाहीर झालेल्या मा.राष्ट्रपतींचे पोलीस पदकाचा अलंकरण सोहळा आज दिनांक 13/10/22 रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंह कोशारी यांचे हस्ते मा.राष्ट्रपतींचे पोलीस पदक व प्रमाणपत्र देऊन राजभवन मुंबई येथे सोहळा संपन्न झाला आहे.
आई वडिलांची शिकवण त्यांनी दिलेले संस्कार व खऱ्या अर्थाने लाभलेली त्यांची पुण्याई तसेच मोठे भाऊ पी डी सावंत वहिनी सौ पूजा सावंत यांनी कॉलेज जीवनात दिलेले शिक्षण व पोलीस दलात परीक्षा देण्यासाठी बंधुने दिलेले पाठबळ व 28 वर्षाच्या नोकरीमध्ये सर्वात जास्त त्याग करून पत्नी ललिताने कशाचीही तमा न बाळगता अनेक वेळा आलेल्या जोखीमभरी संकटात वेळ-काळ न बघता दिलेली खंबीर साथ,मोठी मुलगी आराधना व छोटी हरिप्रिया यांनी कधीही हट्ट न करता दिलेल्या पाठिंब्यामुळे पोलीस पदकाचा व या सोहळ्याचा मानकरी होण्यास पात्र ठरलो आहे असे सावंत यांना मनोमनी वाटते.
त्यांच्या नोकरीत लाभलेले चांगले वरिष्ठ, सहकारी व दुय्यम अधिकारी तसेच अनेक कठीण प्रसंगी ज्यांनी त्यांना कणखरपणे साथ दिली ते त्यांचे पोलीस अंमलदार बांधव यांचा वाटा प्राप्त झालेल्या पोलीस पदकामध्ये मोठा आहे असे सावंत यांनी आवर्जून नमुद केले आहे, त्यांनी केलेल्या कामास मा.राष्ट्रपतींच्या पोलीस पदकाने आजवर महाराष्ट्रात केलेल्या कामाची ओळख करून दिली आहे.पोलीस दलातील 28 वर्षाच्या सेवेत राज्यात मुंबई,नाशिक, जळगाव,गुन्हे अन्वेषण विभाग पुणे,अहमदनगर व कोल्हापूर येथे नोकरी केली असून नोकरी दरम्यान केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत आजपर्यंत एकूण सुमारे 400 बक्षिसे प्राप्त,तसेच विविध वरिष्ठांचे कडून मिळालेली अनेक प्रशांसापत्र त्यामध्ये प्रामुख्याने
सन 2010 मध्ये उत्कृष्ठ अधिकारी म्हणून महराष्ट्र सरकाने तत्कालीन मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री महोदयांच्या हातून विशेष बक्षीस व सत्कार.
पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी करीता सन 2012 मध्ये मा.पोलीस महासंचालक पदकाने सन्मानीत.
28 जानेवारी 2020 रोजी किणी टोल नाक्यावर राजस्थान राज्यातील कुख्यात 007 बिष्णोई गॅंग सोबत झालेल्या चकमकीत गँग लीडर शामलाल पुनिया याने केलेल्या फायरिंगचा समोरासमोर मुकाबला करून स्वतः पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी त्यांच्या सर्विस पिस्टल मधून 6 राउंड फायर करून गुन्हेगारांना जखमी करून तीन कुख्यात गँगस्टरला जेरबंद केले,सदरचे गँगस्टर 2017 पासून राजस्थान पोलीसांना वॉन्टेड होते ती कामगिरी 2020 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत यांच्या टीमने केली. सदर फायरिंग मध्ये किणी टोल नाक्यावर प्रचंड रहदारी असताना गँगस्टरकडून नागरिकांना कोणताही धोका पोहचून न देता सावंत यांनी केलेल्या फायरिंगमध्ये दोन गँगस्टरला जखमी करून जेरबंद केले,त्यामध्ये प्रवाशी व पोलीस जखमी न होता ही कामगिरी पार पाडल्यामुळे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता,मा.पोलीस महासंचालक यांनी 1 लाख रु.रोख व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या तीन मंत्री महोदयांच्याकडून सन्मान देऊन गौरविण्यात आले,पोलीस दलात कामगिरी करताना अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल,अनेक कुख्यात गुंडांना जेरबंद,सामान्य जनतेच्या चोरीस गेल्याले करोडो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरी करीता केंद्र शासनाने दखल घेऊन 26 जानेवारी 2021 मध्ये मा.राष्ट्रपतींचे पोलीस पदकाने सन्मानीत केले असून महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे पोलीस पदक व मा.राष्ट्रपतींचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
मा.प्रदीप देशपांडे, मा.अभिनव देशमुख व मा.शैलेश बलकवडे हे त्यांचे आदर्श अधिकारी असून त्यांच्या अधिपत्याखाली चांगले काम करण्याची संधी मिळाली असे मत त्यांनी व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here